युक्रेनच्‍या राष्‍ट्राध्‍यक्ष म्‍हणतात,"आता रशिया युरोपवरच..."

युरोपीय देशांना संयुक्त सैन्य तयार करण्याचे केले आवाहनही
Ukraine presidnet volodymyr Zelenskyy
युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष झेलेन्‍स्‍की File Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : मागील तीन वर्षांपासून रशिया-युक्रेन संघर्ष कायम राहिला आहे. अमेरिकेतील सत्तांतरानंतर या संघर्षाला पूर्णविराम मिळण्‍याची शक्‍यता व्‍यक्‍त केली होती. पण, आता रशिया युरोपवरच हल्‍ला करेल, असा दावा युक्रेनचे राष्‍ट्राध्‍यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी केला आहे. तसेच युरोपीय देशांना संयुक्त सैन्य तयार करण्याचे आवाहनही त्‍यांनी केले आहे.

म्युनिक सुरक्षा परिषदेत बोलताना झेलेन्स्की म्‍हणाले की, "अमेरिका युरोपच्या सुरक्षा मुद्द्यांना नकार देऊ शकते. जर असे झाले तर ते युरोपच्या सुरक्षेला गंभीर धोका निर्माण होईल. गुप्तचर संस्थेकडून कळले आहे की रशिया या उन्हाळ्यातच युरोपला लक्ष्य करण्याची तयारी करत आहे."

रशियन सैन्‍यदलात दीड लाख जवानांची भरती

झेलेन्स्की यांनी दावा केला की, रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन हे सैन्‍य दलात दीड लाख जवानांची भरती करत आहे. ही संख्‍या युरोपमधील सर्व देशांच्‍या सैन्यांपेक्षा जास्त आहे. रशियामध्ये दर आठवड्याला सैन्य भरती कार्यालये उघडली जात आहेत. आमच्‍या गुप्तचर सेवांना माहिती दिली आहे की, रशिया या उन्हाळ्यात प्रशिक्षण सरावाच्या बहाण्याने बेलारूसमध्ये सैन्य पाठवण्याची योजना आखत आहे. ही युरोपीय देशांविरुद्धच्या मोहिमेची सुरुवात असू शकते. दरम्‍यान, नाटोच्या लष्करी समितीचे अध्यक्ष अॅडमिरल गिउसेप्पे कावो ड्रॅगोन यांनी सांगितले की, सध्या त्यांच्याकडे कोणतीही पुष्टीकृत माहिती नाही.

युरोपला संयुक्‍त सैन्‍यदल उभारण्याची गरज आहे

युरोपमधील सर्व देशांनी एकत्र येवून स्वतःचे संयुक्‍त सैन्‍यदल तयार करण्याची वेळ आली आहे. अमेरिका युरोपला धोका निर्माण करू शकणाऱ्या मुद्द्यांवर कोणतीही प्रतिक्रिया देणार नाही, हे आता आपण नाकारू शकत नाही. युरोपला एकत्र येऊन एक समान परराष्ट्र आणि संरक्षण धोरण तयार करण्याची आवश्यकता आहे. आपण आपल्‍या सुरक्षेबद्दल गंभीर असल्‍याचा संदेश जाईल.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news