UK Breakup | ब्रिटनमधून वेगळे होणार स्कॉटलंड, वेल्स, उत्तर आयर्लंड?

कार्डिफमध्ये नेत्यांची आज बैठक
UK Breakup |
UK Breakup | ब्रिटनमधून वेगळे होणार स्कॉटलंड, वेल्स, उत्तर आयर्लंड?
Published on
Updated on

लंडन; वृत्तसंस्था : ब्रिटनची एकसंधता कायम राहणार का, यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. स्कॉटलंड, वेल्स आणि उत्तर आयर्लंडमधील सरकार प्रमुखांची सोमवारी वेल्सची राजधानी कार्डिफ येथे बैठक होणार आहे. या बैठकीला आयर्लंडच्या सिन फेन पक्षाच्या नेत्या मेरी लू मॅकडोनाल्डही उपस्थित राहणार आहेत.

तिन्ही प्रादेशिक सरकारप्रमुखांकडून प्रत्येक प्रदेशाला आपल्या भवितव्याचा निर्णय घेण्याचा लोकशाही अधिकार असावा, अशी संयुक्त भूमिका मांडली जाण्याची शक्यता आहे. स्कॉटलंडमध्ये एसएनपी, वेल्समध्ये प्लेड कम्री आणि उत्तर आयर्लंडमध्ये सिन फेन हे अनुक्रमे स्वातंत्र्य किंवा आयर्लंडशी एकीकरणाचे समर्थक आहेत. त्यामुळे या बैठकीकडे ब्रिटनवरील राजकीय दबाव वाढविणारी घटना म्हणून पाहिले जात आहे. स्कॉटलंडच्या स्वातंत्र्याचा मुद्दा सर्वाधिक चर्चेत आहे.

ब्रिटनचे पंतप्रधान अँडी बर्नहॅम यांनी स्वातंत्र्याला पाठिंबा वाढल्यास जनमतसंग्रहाचा विचार होऊ शकतो, असे म्हटले होते. नंतर स्पष्टीकरण देत पुढील सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी असा जनमतसंग्रह होणार नसल्याचे स्पष्ट केले. स्कॉटलंडचे मंत्री जॉन स्विनी यांनी ब्रिटनची एकसंधता टिकविणाऱ्या विद्यमान व्यवस्थेवर दबाव वाढत असल्याचे म्हटले. वेल्समध्येही अधिक स्वायत्ततेची मागणी जोर धरत आहे. उत्तर आयर्लंडमध्ये १९९८च्या गुड फ्रायडे करारानुसार, ब्रिटनपासून वेगळे होऊन आयर्लंडमध्ये सामील होण्याच्या बाजूने बहुमत असल्याचे दिसल्यास जनमतसंग्रह घेता येतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news