पुढारी ऑनलाईन : मुंबईवरील 26/11 दहशतवादी हल्ल्यातील आरोपी तहव्वुर राणा यांनी अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात त्याच्या प्रत्यार्पणाला तात्काळ स्थगिती देण्याची मागणी करणारी याचिका दाखल केली आहे, असे वृत्त 'इंडिया टुडे'ने दिले आहे. तहव्वुर राणा लॉस एंजेलिसमधील तुरुंगात आहे. २६ नाेव्हेंबर २००८ राेजी मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात १६६ जण ठार झाले हाेते.
राणाने याचिकेत म्हटलं आहे की, भारतात माझा छळ होण्याची शक्यता जास्त आहे कारण तो पाकिस्तानी वंशाचा मुस्लिम आहे. तो अनेक आजारांनी ग्रस्त आहे. त्याला हृदयविकाराचा झटका, पार्किन्सन आणि संभाव्य मूत्राशयाचा कर्करोग यांचा समावेश आहे. राणाच्या वकिलांनी असा युक्तिवाद केला की तो खटल्याला सामोरे जाण्यासाठी जास्त काळ जगू शकणार नाही.
२१ जानेवारी रोजीअमेरिकन सर्वोच्च न्यायालयाने राणाने दाखल केलेली पुनर्विचार याचिका फेटाळली. गेल्या महिन्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अमेरिका भेटीदरम्यान, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी घोषणा केली की, त्यांच्या प्रशासनाने राणाच्या प्रत्यार्पणाला मान्यता दिली हाेती.