Wikipedia blocks co founder : 'विकिपीडिया'ने सह-संस्थापकालाच केले 'ब्लॉक'! नेमकं कारण काय?

साइटवर बदल करण्यापासून रोखण्याच्या निर्णयावर सँगर यांनी व्यक्त केले आश्चर्य
Wikipedia blocks co founder
विकिपीडियाने आपले सह-संस्थापक लॅरी सँगर यांना प्लॅटफॉर्मवर संपादन करण्यापासून तात्पुरते प्रतिबंधित (block) केले.File Photo.
Published on
Updated on

Wikipedia blocks co founder : विकिपीडियाने आपले सह-संस्थापक लॅरी सँगर यांना प्लॅटफॉर्मवर संपादन करण्यापासून तात्पुरते प्रतिबंधित (block) केले. या वेबसाईटवर सँगर यांनी अधिक संतुलन, निष्पक्षता आणि वैचारिक विविधतेची मागणी केल्यानंतर ही कारवाई करण्यात आली. सँगर यांनी २००१ मध्ये जिमी वेल्स यांच्यासोबत या ऑनलाईन ज्ञानकोशाची (Encyclopedia) स्थापना केली होती, 'विकिपीडिया' हे नाव त्यांनीच दिले होते आणि त्याचे मूळ पायाभूत नियमही त्यांनीच तयार केले होते.

सँगर यांनी निर्णयावर व्यक्त केले आश्चर्य

'द न्यूयॉर्क पोस्ट'च्या रिपोर्टनुसार, सँगर यांनी या निर्णयावर आश्चर्य व्यक्त केले असून, "मला धक्‍का बसला आहे," अशी प्रतिक्रिया दिली. हा वाद गेल्या महिन्यात सुरू झाला. सँगर यांनी 'विकिप्रोजेक्ट इंटेलेक्चुअल डायव्हर्सिटी' (WID) उपक्रम सुरू केला. विकिपीडियाच्या तटस्थतेवर आणि पारदर्शकतेवर भर देत, प्लॅटफॉर्मची "वैचारिक विविधतेची मूळ आणि ठाम वचनबद्धता" पुन्हा मजबूत करण्यासाठी हा उपक्रम तयार करण्यात आला आहे.

Wikipedia blocks co founder
Controversy : प्रणित मोरेच्या कॉमेडी शोमधील विधानावरून गदारोळ! महिलांवर अश्लील टीप्पणी करणा-या तरुणाची नोकरीमधून हकालपट्टी

सगळेच एका बाजूने असतील, तर...

त्यांना ब्लॉक करण्यामागचे नेमके अधिकृत कारण देण्यात आले नसले तरी, सँगर यांनी सध्याच्या विकिपीडिया संपादन समुदायाचे वर्णन एक 'टोळी' (mob or blob) म्हणून केले आहे, हे युजर्स वस्तुनिष्ठ नियमांच्या सामायिक दृष्टिकोनाऐवजी एकमेकांशी एकनिष्ठ राहतात. सगळेच एका बाजूने असतील, तर अनेक कडक आणि महत्त्वाच्या नियमांनाही केवळ साधे मार्गदर्शक तत्त्व मानून बाजूला सारले जाते," असेही त्‍यांनी म्‍हटलं होतं.

Wikipedia blocks co founder
Orry Reel Earnings: सेलिब्रिटींचा यार ओरीला एका रीलसाठी किती रुपये मिळतात? कमाईचा आकडा वाचून तुम्हालाही बसेल धक्का

विकिपीडियावर 'चेहरा नसलेल्या टोळी'चे नियंत्रण: सँगर

विकिपीडियाचा दावा आहे की त्यांची माहिती लाखो स्वयंसेवकांद्वारे लोकशाही मार्गाने व्यवस्थापित केली जाते. गेल्या महिन्यात २,६७,००० सक्रिय योगदानकर्ते असल्याचा दाखला त्यांनी दिला आहे. मात्र, सँगर यांच्या मते, याचे नियंत्रण प्रशासकांच्या एका छोट्या आणि गुप्त गटाकडे आहे. याला "पॉवर ६२" (Power 62) म्हणतात. त्यांनी असा दावा केला आहे की या शक्तिशाली अकाऊंट्सपैकी ८५% अकाऊंट्स पूर्णपणे निनावी नावांच्या मागे लपलेले आहेत.

Wikipedia blocks co founder
कपिल देव यांची सही, भारतीय संघाने खरेदी केली दारू आणि सिगारेट? १९८३च्या पार्टीचे बिल व्हायरल; माजी क्रिकेटपटूचा मोठा खुलासा

'विकिपीडिया' समुदायात मोठी खळबळ

सँगर यांना बाहेर काढण्याची मोहीम प्लॅटफॉर्मवरील 'टार्निश्डपाथ' नावाच्या एका निनावी संपादकाने सुरू केली होती. विकिपीडियाच्या सह-संस्थापकावरील या बंदीमुळे समुदायामध्ये मोठी खळबळ उडाली आहे. अनेक अंतर्गत संपादकांनी या ब्लॉकच्या योग्यतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. सँगर यांनी सोशल मीडिया फ्‍लॅटफॉर्म 'X' वर ब्लॉकचा पर्दाफाश केल्यानंतर सोशल मीडियावर तीव्र संताप व्यक्त झाला. या जनक्षोभानंतर त्यांचे संपादन खाते (editing account) गुपचूप पूर्ववत करण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news