लंडन (ब्रिटन) : पुढारी ऑनलाईन
ब्रिटनमधील इक्वाडोर देशाच्या दुतावासात राजकीय आश्रय घेतलेल्या विकिलीक्सचा संस्थापक ज्युलियन असांजे याच्या अडचणी आता आणखी वाढल्या आहेत. असांजे याला दुतावासातून बाहेर काढण्याची तयारी इक्वाडोरने केली आहे.
असांजेने आता दुतावासातून बाहेर जावे, असा तगादा आता इक्वाडोरचे राष्ट्रपती लेनिन मोरेनो यांनी लावला आहे. ४७ वर्षीय असांजे २०१२ पासून लंडनमधील नाईटसब्रिज भागातील इक्वाडोर दुतावासात रहात आहे.
असांजे याला आता आश्रय मिळणार नाही. याचा अर्थ असा की त्याने दुतावास सोडून जावे, असे इक्वाडोरकडून सांगण्यात आले आहे. विकिलीक्सच्या माध्यमातून जगभरातील गुप्त आणि संवेदनशील माहिती लीक करण्यात असांजे माहीर आहे. त्याचे अमेरिकेत प्रत्यार्पण होण्याची शक्यता आहे.