पुढारी: ऑनलाईन डेस्क
सेक्स ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात ताकदवान गोष्ट आहे. सेक्समुळे आपला मूड सुधारण्यास मदत होते. सेक्समुळे दोघांच्याही कंबरेवर चांगलाच ताण पडतो. अहो, इतकंच नाही तर सेक्स केल्याने आपलं आयुष्यदेखील वाढते, असं नुकत्याच प्रकाशित झालेल्या संशोधनातून स्पष्ट झालंय. आपलं वृद्धत्व कमी करण्यासाठी किती वाजता सेक्स करायला हवा, हे जाणून घेऊया…
आपल्याला अगोदरच माहिती आहे की, आपल्या सेक्स लाईफवर हार्मोन्सचा परिणाम जास्त होतो. बंद खोलीतल्या गप्पा, सेक्स, रिलेशन्स, यावर बोलायला आपल्याला आवडतं. सेक्सनंतर दोघांमध्ये होणार्या गप्पावरून आपण जोडीदाराच्या सेक्सबद्दलच्या कल्पना आणि विचार समजून घेतले पाहिजेत.
अधिक वाचले जाणारे…
लोकांची सेक्स करण्याची इच्छा का कमी होतेय?
प्रथमच सेक्स करताय? तर, 'ही' काळजी नक्की घ्या!
थोर विचारवंतांच्या 'सेक्स'बद्दलच्या टिप्स माहिती आहेत का?
'वुमेन कोड' नावाच्या बेस्टसेलर ठरलेल्या हार्मोन्स तज्ज्ञ अॅलिसा विट्टी सांगतात की, "आपण जेव्हा सेक्स करण्यास सुरू करतो. त्यावेळी जो सेक्सचा परमोच्च सुखाचा आनंद अनुभवतो किंवा सेक्सचा क्लायमेक्स अनुभवतो, तो त्या दिवसातील सर्वात महत्वाचा क्षण असतो. इतकंच नाही, तर सेक्समुळे तुम्ही तुमच्या जोडीदारालाही सेक्सच्या परमोच्च आनंदाकडे नेत असता."
तर, सेक्स करण्याची योग्य वेळ कोणती? त्यावर हार्मोन्स तज्ज्ञ अॅलिसा विट्टी सांगतात की, "दुपारी ३ वाजण्याची वेळ ही सेक्स करण्याची योग्य वेळ आहे. स्त्रीयांमध्ये जेव्हा पुरेसे काॅर्टिसोल हार्मोन्स (नैसर्गिक संप्रेरक) असतात. तेव्हा त्या सेक्समध्ये अत्यंत सक्रीय आणि सक्षम असतात. त्याचवेळी पुरुषांमध्ये असणार्या टेस्टोटेराॅन नावाचं हार्मोन्स कमी होत जातं. याच दरम्यान दोघांमध्ये भावनिक गुंतवणूक जास्त वाढते."
अधिक वाचले जाणारे…
कोरोनानंतर किती दिवसांनी करावा सेक्स?
डेटिंग अॅप्सद्वारे 'व्हर्च्युअली सेक्स'चं प्रमाण वाढलंय!
पृथ्वीतलावर पहिला 'सेक्स' कधी आणि कुणी केला?
विट्टी असं सांगतात की, "सेक्समध्ये समाधान हवं असेल तर आपल्या दोघेही सेक्स आणि हार्मोन्सबद्दल आत्म-जागृत असायला हवे. बहुतांशी महिला या सध्या वेगवेगळ्या अॅप्समधून आपल्या जोडीदाराला किंवा स्वतःला सेक्समध्ये समाधान कसं मिळवायचं हे शोधतात. तुम्हाला दुपारी ३ वाजता सेक्स करण्यास शक्य नसेल तर, पहाटेची वेळ योग्य आहे. कारण, पुरुषांमधील टेस्टाॅटेराॅन नावाचं संप्रेरकं जास्त उत्तेजित झालेली असतात. झोपेच्या दरम्यान हार्मोन्स अतिउच्च पातळीवर तयार झालेले असतात. सुरुवातीच्या टप्प्यात पुरुष हा सेक्ससाठी खूप अधीर असतो आणि त्याचवेळी पुरूष आपल्या जोडीदारणीला परमोच्च प्रतिसाद देऊ शकतो."