Mukesh Ambani Satellite | 'आम्ही कधीही स्पर्धेला घाबरत नाही' इलॉन मस्क यांच्या आरोपांना रिलायन्स इंडस्ट्रीजचे चोख प्रत्युत्तर

Mukesh Ambani Satellite | मस्क यांच्या टीकेला रिलायन्सचे चोख प्रत्युत्तर
Reliance India Ltd. - Mukesh Ambani
Reliance India Ltd. - Mukesh Ambani Pudhari
Published on: 
Updated on: 

नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतातील सॅटेलाइट ब्रॉडबँड सेवेवरून स्पेसएक्सचे प्रमुख इलॉन मस्क आणि रिलायन्स उद्योग समूहमध्ये जोरदार शाब्दिक वाद सुरू झाला आहे. मस्क यांनी मुकेश अंबानींलवर भारतात मक्तेदारी निर्माण करण्याचा आणि स्टारलिंकच्या प्रवेशात अडथळे आणल्याचा आरोप केला होता. या पार्श्वभूमीवर रिलायन्स इंडस्ट्रीजने निवेदन प्रसिद्ध करून आपली भूमिका स्पष्ट केली.

Reliance India Ltd. - Mukesh Ambani
Delhi-Mumbai Expressway Accident: दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; बस दरीत कोसळली, आठ जणांचा जागीच मृत्यू

रिलायन्सने स्पष्ट केले की, ते सॅटेलाइट कम्युनिकेशन क्षेत्रात खुल्या स्पर्धेचे स्वागत करतात. रिलायन्सने स्पर्धेला कधीही भीती मानली नाही. जिओने २०१६ मध्ये जेव्हा दूरसंचा क्षेत्रात प्रवेश केला, तेव्हा एकही ग्राहक नव्हता.

आज ५३० दशलक्षाहून अधिक ग्राहक आमच्यासोबत आहेत. भारतात गुंतवणूक व नवोपक्रमाचे नेहमीच स्वागत झाले आहे. मात्र त्यासाठी देशातील कायदे व नियमांचे पालन करणे प्रत्येक कंपनीला बंधनकारक आहे. जिओच्या स्वतःच्या सॅटेलाइट सेवेलाही अद्याप सर्व आवश्यक परवानग्या मिळणे बाकी आहे, असे रिलायन्सने नमूद केले.

Reliance India Ltd. - Mukesh Ambani
CJP Tiranga March : 'सीजेपी'च्‍या ‘तिरंगा मार्च’ला स्थगिती देण्यास हायकोर्टाचा नकार; दिल्ली पोलिसांनी दिले कारवाईचे संकेत

केंद्र सरकारचे स्पष्टीकरण
केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांनी या वादावर भाष्य करताना म्हटले की, देशात कोणाचीही मक्तेदारी चालणार नाही. भारताची परवाना प्रणाली निष्पक्ष व पारदर्शक असून स्टारलिंकसह सर्व कंपन्यांना सुरक्षेचे निकष पूर्ण करावे लागतील.

इलॉन मस्क यांचे गंभीर आरोप
इलॉन मस्क यांनी 'एक्स'वर सलग पोस्ट करत मुकेश अंबानींवर निशाणा साधला होता. मस्क यांनी उपरोधाने अंबानींचा उल्लेख पंतप्रधान अंबानी असा करत, ते देशात स्वतःची मक्तेदारी टिकवून ठेवण्यासाठी इतर कंपन्यांना रोखत असल्याचा आरोप केला होता. स्पर्धा वाढल्यास नफा कमी होईल; पण व्यवसाय बंद पडणार नाही, असा दावाही त्यांनी केला.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news