Donald Trump | युद्ध संपण्याच्या मार्गावर! ट्रम्प यांच्या वक्तव्याने शेअर बाजारात उसळी

Donald Trump |
Donald Trump | युद्ध संपण्याच्या मार्गावर! ट्रम्प यांच्या वक्तव्याने शेअर बाजारात उसळी
Published on
Updated on

अनिल टाकळकर

वॉशिंग्टन डी. सी. : गेल्या आठवड्यात पाकिस्तानातील शांतता चर्चा फिस्कटल्याच्या पार्श्वभूमीवर, इराणविरोधातील युद्ध संपण्याच्या अगदी जवळ आले आहे, असे वक्तव्य अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केले असून, त्यामुळे बुधवारी भारतीय शेअर बाजाराने उसळी घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले. तसेच, येत्या दोन दिवसांत नव्याने शांतिवार्ता सुरू केली जाण्याचे स्पष्ट संकेत अमेरिकेने दिले आहेत. त्यामुळे संपूर्ण जगाला ग्रासलेले हे युद्ध आता अंतिम टप्प्यात आल्याचे जवळपास स्पष्ट झाले आहे.

‘फॉक्स बिझनेस नेटवर्क’च्या ‘मॉनिर्र्ंग वुईथ मारिया’ या कार्यक्रमात ट्रम्प म्हणाले, आम्ही इराणला लष्करीद़ृष्ट्या धूळ चारली आहे. त्यामुळे मला वाटते की, हे युद्ध संपण्याच्या अगदी जवळ आले आहे. आम्ही आताच युद्धातून बाहेर पडलो, तरी इराणला स्वतःचा देश पुन्हा उभा करण्यासाठी किमान 20 वर्षे लागतील. माझ्या मते, इराणला शांतता करार करायची फारच तीव्र इच्छा आहे.

गेल्या आठवड्यात पाकिस्तानमधील शांतता चर्चा फिस्कटली असली, तरी पुन्हा चर्चेची दुसरी फेरी होऊ शकते, असे संकेत ट्रम्प यांनी दिले आहेत. त्यामुळे अमेरिका-इराण युद्धावर राजनैतिक तोडगा निघू शकतो, अशी आशा जागतिक पातळीवर वाढत चालली आहे. इराणविरोधातील अमेरिकन लष्करी कारवाईचे समर्थन करताना त्यांनी सांगितले की, इराणकडे अण्वस्त्रे असता काम नयेत. यासाठी आम्हाला त्यांना रोखावेच लागेल. युद्ध संपल्यानंतर शेअर बाजारात तेजी येईल, असा अंदाजही ट्रम्प यांनी व्यक्त केला.

युद्ध संपण्याच्या वार्तेने शेअर निर्देशांक वधारले

मुंबई ः अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणशी सुरू असलेले युद्ध अंतिम टप्प्यात आले असल्याचे वक्तव्य केल्यानंतर लगेचच त्याचे सकारात्मक पडसाद भारतीय शेअर बाजारात उमटले. सेन्सेक्स 1,263 आणि निफ्टी निर्देशांक 388 अंकांनी वधारला.

‘होर्मुझ’ची नाकेबंदी सुरूच

इराणच्या नियंत्रणाखाली असलेल्या महत्त्वाच्या होर्मुझ सामुद्रधुनीवरील नाकेबंदी अमेरिकेने कायम ठेवली आहे.

अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने दिलेल्या माहितीनुसार, इराणी बंदरांमध्ये जहाजांना

ये-जा करण्यास प्रतिबंध करणारी ही

नाकेबंदी पूर्णपणे लागू करण्यात आली असून, त्यामुळे तेहरानचा आंतरराष्ट्रीय सागरी

व्यापार पूर्णपणे तोडण्यात आला आहे.

अमेरिका-इराण चर्चेची दुसरी फेरी दोन दिवसांत

मंगळवारी व्हाईट हाऊसच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, वॉशिंग्टन आणि तेहरान यांच्यात दुसर्‍या फेरीच्या चर्चेवर विचार सुरू आहे. मात्र, मंगळवारपर्यंत कोणतीही अधिकृत बैठक निश्चित करण्यात आलेली नव्हती, अशी माहिती नाव न सांगण्याच्या अटीवर त्या अधिकार्‍याने दिली. यानंतर ट्रम्प यांनी ‘न्यूयॉर्क पोस्ट’ला इस्लामाबादमध्ये अमेरिका-इराण यांच्यात पुढील दोन दिवसांत नव्याने चर्चा होऊ शकते, असे सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news