Putin poop suitcase | पुतीन यांनी अलास्का शिखर परिषदेत सोबत नेली होती 'मलमूत्र सुटकेस'; काय आहे या 'पूप सुटकेस'चे रहस्य?

Putin poop suitcase | पुतीन यांच्या प्रत्येक परदेश दौऱ्यात सोबत असते ही सुटकेस...
Putin poop suitcase
Putin poop suitcase Pudhari
Published on
Updated on

Vladimir Putin poop suitcase in Alaska meet

अलास्का : येथे अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्यातील उच्चस्तरीय शिखर परिषद नुकतीच पार पडली. जगभराचे लक्ष या महत्त्वाच्या भेटीकडे लागले होते. परंतु, या चर्चेच्या मागे एक अनोखी गोष्ट घडत होती. पुतिन यांच्या सुरक्षारक्षकांनी त्यांच्यासोबत एक विशेष सुटकेस बाळगले होते. ही सुटकेस ना कागदपत्रांसाठी होती, ना शस्त्रास्त्रांसाठी. तर ती सुटकेस होती पुतीन यांच्या मलमुत्रासाठी.

पुतिन यांच्या मलमूत्राचे नमुने जमा करून ते रशियात परत नेण्यासाठी या सुटकेसचा वापर होतो. म्हणूनच या सुटकेसला पूप सुटकेस असे म्हणतात.

सुरक्षेचे कारण...

Express US या वृत्तसंस्थेच्या अहवालानुसार, पुतिन यांच्या वैयक्तिक सुरक्षेचा हा भाग असून, हा सवयीतला भाग त्यांच्या अनेक आंतरराष्ट्रीय दौर्‍यांमध्ये दिसून आलेला आहे. त्यामागील कारण स्पष्ट आहे – पुतिन यांना भीती आहे की परदेशी गुप्तचर यंत्रणा त्यांच्या शारिरीक स्थितीबद्दल माहिती मिळवण्यासाठी त्यांच्या शरीरातील जैविक स्त्राव (जसे की मल व मूत्र) वापरू शकतात.

आणि तेच कुणाच्याही हाती लागू नये, त्यातून स्वतःला धोका निर्माण होऊ नये, म्हणून पुतीन प्रत्येक परदेश दौऱ्यात ही पूप सुटकेस सोबत बाळगतात.

Putin poop suitcase
Russia Ukraine Drone Attack |अलास्का येथे पुतीन-ट्रम्प भेटीनंतर काही तासातच रशियाचा युक्रेनवर मोठा हवाई हल्ला

सुरक्षेचा विचित्र पण गंभीर भाग

या प्रक्रियेनुसार, रशियाच्या Federal Protection Service (FSO) चे सदस्य या मलमूत्राचे नमुने विशेष पॅकेट्समध्ये गोळा करतात आणि हे पॅकेट्स एका खास सुटकेसमध्ये ठेवून ती पुन्हा मास्कोला नेली जाते.

या प्रथेचा उल्लेख फ्रेंच मासिक "Paris Match" ने 2017 मध्ये केला होता. तेव्हाही पुतिन यांच्या फ्रान्स आणि 2019 मधील सौदी अरेबियातील दौऱ्यात अशीच व्यवस्था केली गेल्याचे सांगितले गेले होते.

आरोग्याबाबत चिंता

अमेरिकेच्या DIA (Defense Intelligence Agency) या गुप्तचर संस्थेतील माजी अधिकारी रेबेका कॉफ्लर यांनी Fox News ला दिलेल्या माहितीनुसार, पुतिन यांना खात्री आहे की परकीय गुप्तचर संस्था त्यांचे जैविक नमुने तपासून त्यांच्या आजारांबाबत निष्कर्ष काढू शकतात.

पुतिन यांच्या आरोग्याबद्दल गेल्या काही वर्षांत अनेक तर्क-वितर्क समोर आले आहेत. 2024 मध्ये कझाकस्तानमधील आस्तानामधील पत्रकार परिषदेदरम्यान त्यांच्या पायात कंप येताना दिसले होते, ज्यामुळे पार्किन्सन्ससारख्या न्यूरोलॉजिकल विकारांची शक्यता वर्तवली गेली होती.

2023 मध्ये बेलारूसचे अध्यक्ष अलेक्झांडर लुकाशेंको यांच्याशी बैठकीदरम्यान पुतिन यांना हलके झटके येताना देखील पाहिले गेले होते. 2022 मध्ये, General SVR या टेलिग्राम चॅनलने असा दावा केला होता की पुतिन पडल्यामुळे स्वतःवर नियंत्रण ठेवू शकले नाहीत. मात्र, क्रेमलिनने हे वृत्त खोटे असल्याचे सांगत त्याचे खंडन केले होते.

Putin poop suitcase
Pakistan flash flood death | पाकिस्तानात फ्लॅश फ्लडमुळे 48 तासांत 320 हून अधिक मृत्यू; बचाव कार्यादरम्यान हेलिकॉप्टर कोसळले...

एकंदरीत या ‘पूप सुटकेस’ प्रकारामुळे एक गोष्ट स्पष्ट होते – रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन त्यांच्या वैयक्तिक माहितीच्या सुरक्षेबाबत फारच काटेकोर आणि गंभीर आहेत. हे उदाहरण जगातील काही शक्तिशाली नेत्यांच्या सुरक्षाव्यवस्थेच्या अजब पैलूंमध्ये मोडते.

अलास्कामधील शिखर परिषदेदरम्यान, जरी ही सुटकेस कॅमेऱ्यांमध्ये दिसली नसली तरीही तिची उपस्थिती पुतिन यांच्या सुरक्षेबाबत बारकाईने केलेल्या नियोजनाचे प्रतीक होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news