

अमेरिकेने व्हेनेझुएलावर हल्ला केल्यानंतर या देशातील सोन्याच्या साठा चर्चेत आला आहे. हा देश केवळ तेलासाठीच नव्हे, तर जमिनीत दडलेल्या सोन्याच्या साठ्यासाठीही ओळखला जातो. व्हेनेझुएला हा असा देश आहे, ज्याच्याकडे केवळ सोन्याचा साठाच नाही, तर जमिनीत दडलेला सोन्याचा प्रचंड साठाही आहे, जो खाणकामाद्वारे काढला जातो.
व्हेनेझुएला जगातील सर्वात मोठ्या तेल साठ्यासाठी ओळखला जातो. जगातील कच्च्या तेलाच्या साठ्यापैकी सुमारे 17 टक्के हिस्सा व्हेनेझुएलाकडे आहे; पण फक्त तेलच नाही तर सोनं, निकेल, बॉक्साईटच्या साठ्यानेही व्हेनेझुएला समृद्ध आहे. म्हणूनच ट्रम्प यांची नजर या देशावर होती.
व्हेनेझुएलाकडे 8,000 टनांपेक्षा जास्त सोन्याचा साठा आहे, जो त्याला जगातील सर्वात संसाधन संपन्न देशांपैकी एक बनवतो. व्हेनेझुएलाने आपल्या आर्थिक संकटाच्या काळात कर्ज फेडण्यासाठी आणि अर्थव्यवस्थेत परकीय चलन आणण्यासाठी वारंवार आपल्या सोन्याच्या साठ्याचा वापर केला आहे.
व्हेनेझुएलाच्या खनिज संपत्तीचे केंद्र ओरिनोको खाण क्षेत्र आहे. याशिवाय बोलिवर राज्यालाही पारंपरिक सोन्याच्या क्षेत्रासाठी ओळखले जाते. या क्षेत्रात 8,000 टनांपेक्षा जास्त सोनं, हिरे आणि इतर खनिजे आहेत. यांचे उत्खनन झाल्यास व्हेनेझुएला जागतिक स्तरावर सर्वात जास्त संसाधन संपन्न देशांमध्ये सामील होईल.
ओरिनोको आर्कमध्ये कोल्टनचा साठा आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि एअरोस्पेस उद्योगांमध्ये वापरला जाणारे हे एक महत्त्वाचे खनिज आहे. तसेच कॅसिटेराईटही आहे, जे टिनचे खनिज आहे. याव्यतिरिक्त व्हेनेझुएलामध्ये सुमारे 4,07,885 टन निकेलचा साठा आहे. तथापि, व्यावसायिक स्तरावर उत्पादन अद्याप मर्यादित आहे.