Venezuela Earthquake | व्हेनेझुएला भूकंपातील मृतांचा आकडा ३,८११ वर; ब्रिटनकडे ठेवलेले ३१ टन सोने परत देण्याचे आवाहन

Venezuela Earthquake |
Venezuela Earthquake | व्हेनेझुएला भूकंपातील मृतांचा आकडा ३,८११ वर; ब्रिटनकडे ठेवलेले ३१ टन सोने परत देण्याचे आवाहन
Published on
Updated on

काराकास; वृत्तसंस्था : व्हेनेझुएलामध्ये २४ जून रोजी झालेल्या दोन शक्तिशाली भूकंपांतील मृतांचा आकडा वाढून ३ हजार ८११ वर पोहोचला आहे. या भीषण नैसर्गिक आपत्तीत १६ हजार ७४० जण जखमी झाले असून, १७ हजार ९०७ नागरिक बेघर झाल्याची माहिती नॅशनल असेंब्लीचे अध्यक्ष जॉर्ज रोड्रिगेज यांनी बुधवारी दिली.

भूकंपानंतर पुनर्बांधणीसाठी मोठ्या प्रमाणात निधीची गरज असून, व्हेनेझुएलाची परदेशात गोठविण्यात आलेली मालमत्ता आणि आर्थिक संसाधने मुक्त करण्यात यावीत, अशी मागणी अंतरिम राष्ट्राध्यक्ष डेल्सी रोड्रिगेज यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाकडे पुन्हा केली आहे. त्यांच्या मते, हा निधी उपलब्ध झाल्यास भूकंपग्रस्त भागांचे पुनर्वसन, रोजगारनिर्मिती आणि शैक्षणिक कार्यक्रम प्रभावीपणे राबविता येतील.

डेल्सी रोड्रिगेज यांनी ब्रिटनचे राजा चार्ल्स तिसरे यांना पत्र लिहून बँक ऑफ इंग्लंडमध्ये ठेवण्यात आलेले व्हेनेझुएलाचे सोने परत करण्याची विनंती केली आहे. तसेच या विषयावर आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुखांशीही चर्चा झाली आहे. सध्या बँक ऑफ इंग्लंडमध्ये व्हेनेझुएलाचे सुमारे ३१ टन सोने ठेवले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news