Venezuela earthquake | ढिगाऱ्यांखाली अडकले अद्याप हजारो प्राण

व्हेनेझुएलात प्रशासकीय यंत्रणा कोलमडली; परदेशी पथकांकडून शोधकार्य सुरू
Venezuela earthquake |
काराकास : व्हेनेझुएलात झालेल्या भूकंपामुळे मोठ्या प्रमाणावर पडझड झालेल्या इमारतींचे ड्रोनने घेतलेले छायाचित्र.
Published on
Updated on

काराकास (व्हेनेझुएला) : राजधानी काराकासमधील ‘बेलो मोंटे’ या मुख्य शवागृहाबाहेर सध्या हृदयद्रावक दृश्ये पाहायला मिळत आहेत. मृतांची ओळख पटवण्यासाठी नातेवाईकांनी येथे प्रचंड गर्दी केली आहे. दुचाकी, कार आणि पिकअप ट्रकमधून मृतदेह शवागृहात आणले जात आहेत. शवागृहात स्वयंसेवक म्हणून काम करणाऱ्या कॅमिला रॉड्रिग्ज यांनी सांगितले की, रविवारी संपूर्ण रस्ता मृतदेह घेऊन येणाऱ्या नातेवाईकांनी भरून गेला होता. स्थानिक प्रशासकीय यंत्रणा कोलमडल्यामुळे मृतदेहांची वाहतूक खासगी वाहनांतून करावी लागत आहे.

व्हेनेझुएलाच्या कॅरिबियन किनारपट्टीला लागोपाठ बसलेल्या दोन भीषण भूकंपाच्या धक्क्यांमुळे संपूर्ण देश हादरला आहे. रिश्टर स्केलवर ७.२ आणि ७.५ तीव्रतेच्या या जुळ्या भूकंपांमुळे शेकडो इमारती जमीनदोस्त झाल्या असून, या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत किमान १,४३० लोकांचा मृत्यू झाला आहे. तर हजारो नागरिक अद्यापही बेपत्ता आहेत.

ढिगाऱ्याखाली निष्पाप जीव

या भूकंपाने अनेकांचे संसार उद्‌ध्वस्त केले आहेत. मार्जोरी सेडेनो नावाच्या एका महिलेने सांगितले की, तिची ४ मजली इमारत कोसळल्यामुळे तिचे आई, वडील आणि भाऊ ढिगाऱ्याखाली गाडले गेले. तिने तिच्या भावाचा मृतदेह ओळखला आहे. मात्र, तिचे ७० वर्षांचे वृद्ध आई-वडील अजूनही ढिगाऱ्याखालीच अडकले आहेत. त्सुनामीच्या खोट्या अफवेमुळे पसरलेल्या भीतीमुळे एका महिलेला वेळेवर उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटनाही समोर आली आहे.

नागरिकांकडूनच मदतीचा हात

देशाच्या काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष डेल्सी रॉड्रिग्ज ढिगाऱ्यातून काही लोकांना जिवंत काढण्यात यश आल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे नागरिकांमध्ये सरकारविरुद्ध तीव्र संताप आहे. मदतकार्य अत्यंत संथ गतीने सुरू असल्याचा आरोप होत आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news