

अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेल्या हल्ल्यामुळे भारतासाठी एक प्रकारची दुहेरी परिस्थिती निर्माण झाली आहे. कारण, हा सत्ताबदल स्थूल अर्थशास्त्रापेक्षा थेट रोख रकमेच्या फायद्या-तोट्याशी अधिक संबंधित आहे.
राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांचे सरकार उलथवून लावण्यासाठी अमेरिकेने व्हेनेझुएलावर केलेला हल्ला भारतासाठी एक प्रकारची द्विधा मनःस्थिती निर्माण करत आहे. यामुळे शेअर बाजारासाठी जरी तटस्थ द़ृष्टिकोन असला, तरी सरकारी तेल उत्पादक कंपन्यांसाठी अब्जावधी डॉलर्सचा संभाव्य फायदा होऊ शकतो.
व्हेनेझुएलातील सत्ताबदल हा स्थूल अर्थशास्त्रापेक्षा रोख रकमेबद्दल अधिक आहे आणि ओएनजीसी विदेश लिमिटेड ही याची मुख्य लाभार्थी असल्याचे दिसते. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पेट्रोलीयोस डी व्हेनेझुएला एसएच्या पुनर्रचनेमुळे ओएनजीसी विदेशची जवळपास 1 अब्ज डॉलर्सची थकीत रक्कम मिळू शकते.
शेअर बाजारावरील परिणाम मोठ्या प्रमाणावर कच्च्या तेलाच्या किमतीच्या दिशेवर अवलंबून आहे. अल्पकाळात पुरवठ्यातील व्यत्ययांमुळे किमतींमध्ये तात्पुरती वाढ होऊ शकते; मात्र ‘पुरवठ्याची स्थिती सुधारल्याने दीर्घकाळासाठी कल नकारात्मक राहील.’
‘दीर्घकाळात तेलाच्या कमी झालेल्या किमतींमुळे अमेरिकेतील महागाईचा दाब कमी होऊ शकतो, ज्यामुळे व्याजदरात आणखी कपात आणि डॉलरचे अवमूल्यन शक्य आहे. ही परिस्थिती उदयोन्मुख बाजारपेठांसाठी अनुकूल असेल.’