

वॉशिंग्टन; वृत्तसंस्था : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संघर्षाचा आमच्याशी प्रत्यक्षात काहीही संबंध नाही. तरीही अमेरिका दोन्ही देशांना संघर्ष कमी करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे. त्याच बरोबर या युद्धातून अणुयुद्ध भडकणार नाही, असे प्रतिपादन अमेरिकेचे उपाध्यक्ष जे. डी. व्हॅन्स यांनी शुक्रवारी केले.
या लोकांना थोडे शांत होण्यासाठी प्रोत्साहन देण्याचे काम आम्ही करू शकतो. पण आम्ही युद्धात हस्तक्षेप करणार नाही. प्रत्यक्षात आमच्या व्यवसायाशी काहीही संबंधित नाही आणि ज्यामध्ये अमेरिकेचे कणभरही नियंत्रण नाही. अमेरिका भारतीयांना किंवा पाकिस्तानला शस्त्र टाकायला सांगू शकत नाही आणि म्हणून, आम्ही हे कार्यतत्त्व डिप्लोमॅटिक चॅनेलद्वारे पुढे नेऊ, असे व्हॅन्स यांनी सांगितले. आमची अपेक्षा आहे की, हे व्यापक प्रदेशीय युद्धात किंवा आण्विक संघर्षात बदलणार नाही, सद्य:स्थितीत आम्हाला असे होईल, असे वाटत नाही, असे व्हॅन्स यांनी सांगितले.