Iran Israel US Conflict: अमेरिकेचे पाच हजार मरीन कमांडो, नौसैनिक आता इराणमध्ये उतरणार

प्रसंगी इराणच्या युद्धभूमीवर आक्रमणाची अमेरिकेची तयारी; युद्धनौकाही सरसावल्या
Iran Israel US Conflict
अमेरिकेचे पाच हजार मरीन कमांडो, नौसैनिक आता इराणमध्ये उतरणार
Published on
Updated on

दुबई : मध्य पूर्वेत सुरू असलेल्या युद्धामुळे परिस्थिती अधिक तणावपूर्ण बनली असून, अमेरिकेने या भागात सुमारे 5,000 अतिरिक्त मरीन कमांडो आणि नौसैनिक तैनात करण्याचा निर्णय घेतला आहे. हे कमांडो आणि नौसैनिक कोणत्याही क्षणी इराणच्या भूमीवर उतरून आक्रमण करण्यासाठी सज्ज असतील, अशी माहिती लष्करी सूत्रांनी दिली.

अमेरिकेच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, ही तैनाती युद्धातील संभाव्य परिस्थिती लक्षात घेऊन करण्यात आली आहे. अमेरिकेच्या संरक्षण यंत्रणेने या निर्णयाला धोरणात्मक तयारीचा भाग असल्याचे म्हटले आहे. अमेरिका आणि इराणमधील संघर्ष गेल्या काही आठवड्यांपासून तीव्र झाला आहे. अमेरिकन आणि इस्रायली सैन्य कारवायांनंतर इराणनेही गल्फ परिसरात क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ल्यांची मालिका सुरू ठेवली आहे. त्यामुळे या प्रदेशातील सुरक्षा परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची बनली आहे.

संकट प्रतिसादासाठी मरीन युनिट सक्रिय

अमेरिकेने पाठवलेले मरीन सैनिक हे जपानमध्ये तैनात असलेल्या 31 मरीन एक्स्पेडिशनरी युनिट या विशेष युनिटचा भाग आहेत. हे युनिट अमेरिकन मरीन कॉर्प्सचे एकमेव कायमस्वरूपी पुढील तैनातीवर असलेले युनिट मानले जाते.हे युनिट जलद प्रतिसादासाठी तयार असते. युद्ध किंवा संकटाच्या काळात ते संघर्षग्रस्त भागातून नागरिकांची सुटका करणे, दूतावासांचे संरक्षण करणे तसेच इतर सैन्य दलांसाठी प्रवेशद्वार तयार करणे अशा महत्त्वाच्या मोहिमा पार पाडते. अमेरिकन अधिकाऱ्यांनी सांगितले की, या तैनातीचा उद्देश केवळ लष्करी कारवाई नसून, संभाव्य संकटांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी तयारी ठेवणे हा आहे.

इराणमध्ये नेतृत्व बदलानंतर तणाव

अमेरिकन-इस्रायली लष्करी मोहिमेच्या सुरुवातीला इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला खामेनी यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचा मुलगा मोज्तबा खामेनी यांना नवा सर्वोच्च नेता घोषित करण्यात आले आहे. मात्र, ते जखमी असल्याच्या बातम्या समोर आल्या असून, ते सार्वजनिकरीत्या दिसलेले नाहीत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news