मुंबई 26/11 हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणाला भारतात आणणार, प्रत्यार्पणास मंजुरी

26/11 Mumbai Attack | तहव्वूर राणाचा मुक्काम सध्या लॉस एंजेलिस येथील तुरूंगात
26/11 Mumbai terror attack
मुंबई 26/11 हल्ल्यातील आरोपी तहव्वूर राणा.(file photo)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : मुंबईवर २६ नोव्‍हेंबर २००८ रोजी (26/11 Mumbai Attack) झालेल्‍या दहशतवादी हल्ल्यातील दोषी तहव्वूर राणा (Tahawwur Rana) याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्यास अमेरिकेतील सर्वोच्च न्यायालयाने मंजुरी दिली आहे. मूळ पाकिस्तानचा, कॅनडाचा नागरिक असलेल्या राणा याच्यावर मुंबईतील अनेक ठिकाणी झालेल्या हल्ल्यांत सहभाग असल्याचा आरोप आहे.

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयात त्याने प्रत्यार्पणाला आव्हान दिले होते. पण त्याची याचिका फेटाळून लावली होती. यामुळे त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

तहव्वूर राणा सध्या लॉस एंजेलिस येथील तुरूंगात आहे. मुंबई हल्ल्यातील सहभागाबद्दल त्याला ३५ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली होती. तहव्वूर राणाला ऑक्टोबर २००९ मध्ये एफबीआयने अटक केली होती. त्याचा पाकिस्तानी-अमेरिकी दहशतवादी डेव्हिड कोलमन हेडलीशी जवळचा संबंध आहे, ज्याला दाऊद गिलानी म्हणून ओळखले जाते. तो दहशतवादी हल्ल्यांतील एक प्रमुख सूत्रधार आहे. त्याच्यावर लष्कर-ए-तैयबा (एलईटी) ला आणि पाकिस्तानमधील इतर दहशतवादी गटांना मदत केल्याचा आरोप आहे.

तहव्वूर हुसेन राणा याची याचिका फेटाळण्यात आली आहे. कनिष्ठ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध नोव्हेंबर २०२४ मध्ये ही रिट दाखल केली होती. न्यायालयाने त्याचे भारताकडे प्रत्यार्पण करण्याच्या बाजूने निकाल दिला होता. डेव्हिड कोलमन हेडली ऊर्फ दाऊद गिलानी आणि इतरांसोबत संगनमत करून मुंबईवर हल्ला करण्याच्या लष्कर-ए-तोयबाच्या कटाची आखणी आणि अंमलबजावणी केल्याचा आरोप तहव्वूर राणावर आहे. मुंबई हल्ल्याच्या कटात सहभागी झाल्याप्रकरणी आणि लष्कर-ए-तोयबाला मदत केल्याप्रकरणी शिकागो न्यायालयाने त्याला २०११ मध्ये दोषी ठरवले होते.

तहव्वूर राणाने कोर्टात काय केला होता दावा?

राणाने दाखल केलेल्या याचिकेत असा दावा केला होता की मुंबई हल्ल्यांशी संबंधित आरोपांवरून त्याच्यावर इलिनोइस (शिकागो) च्या फेडरल न्यायालयात खटला चालवण्यात आला होता आणि त्यात त्याला निर्दोष ठरविण्यात आले होते. त्याने असाही दावा होता की त्याला याच आरोपांवरील दुसऱ्या खटल्यात भारतात पाठवले जाऊ शकते. त्याला दोषी ठरवून फाशीची शिक्षा होण्याची शक्यता आहे.

26/11 Mumbai terror attack
पाकिस्तानमध्ये 'ऑनर किलिंग'च्या घटनांमध्ये वाढ, तीन दिवसांत 8 जणांची हत्या!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news