अमेरिकन शेअर बाजारात सलग दुसऱ्या दिवशीही मोठी घसरण; ट्रम्प म्हणतात, चीनने चुकीची खेळी केली...

US Stock Market: डाऊ जोन्स, नॅसडॅक, एस अँड पी निर्देशांकांची गटांगळी
US Stock Market:
US Stock Market:x
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या रेसिप्रोकल टॅरिफला प्रत्युत्तर म्हणून चीननेही अमेरिकेच्या सर्व वस्तुंवर 34 टक्के अतिरिक्त करांची घोषणा केली. त्याचे पडसाद अमेरिकेच्या शेअर बाजारात उमटले आणि सलग दुसऱ्या दिवशी अमेरिकन शेअर बाजारात मोठी घसरण पाहायला मिळत आहे.

भारतीय प्रमाणवेळेनुसार शुक्रवारी रात्री सव्वाआठ वाजता अमेरिकन शेअर बाजारातील निर्देशांक डाऊ जोन्स 1591 अंकांनी घसरून 38954 वर ट्रेड करत होता. नॅसडॅक निर्देशांक 850 अंकांनी घसरून 15699 वर ट्रेड करत होता. तर एस अँड पी 500 निर्देशांक 257 अंकांनी घसरून 5138 वर ट्रेड करत होता. (US Stock Market)

चीनने अतिरिक्त कराची घोषणा केल्याने जागतिक व्यापार युद्धाची तीव्रता वाढली असून जागतिक शेअर बाजारांमध्ये आणखी घसरत होताना दिसत आहे.

शुक्रवारी 4 एप्रिल रोजी सुरुवातीला S&P 500 मध्ये 2.7 टक्के घसरण झाली, जी कोरोनाकाळात सन 2020 मध्ये जागतिक अर्थव्यवस्थेला मोठा फटका बसल्यानंतर पासूनची सर्वात वाईट घसरण आहे.

डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज 1000 पॉइंट्सने खाली गेला आणि नॅसडॅक कॉम्पोजिट 3 टक्क्यांनी घसरला. US रोजगार बाजाराने जो अहवाल दिला होता तो अपेक्षेहून चांगला असूनही ही घसरण थांबलेली दिसत नाही.

चीनविषयी काय म्हणाले ट्रम्प?

ट्रम्प यांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे की, चीनने चुकीची खेळी केली आहे. ते घाबरले आहेत पण ते त्यांना परवडणारे नाही. दरम्यान, अनेक गुंतवणूकदार अमेरिकेत येत आहेत. प्रचंड मोठी गुंतवणूक अमेरिकेत येत आहे. माझी धोरणे कधीही बदलणार नाहीत. श्रीमंत, अतीश्रीमंत होण्यासाठी ही वेळी यापुर्वीपेक्षा कधी नव्हे इतकी उत्तम आहे, असेही ट्रम्प यांनी म्हटले आहे.

युरोपियन स्टॉक्सही गडगडले

दरम्यान, युरोपियन स्टॉक्सने त्या दिवशीच्या सर्वात मोठ्या तोट्यांचा अनुभव घेतला, आणि क्रूड तेलाची किंमत 2021 नंतरच्या सर्वात कमी पातळीवर घसरली, कारण व्यापार युद्धामुळे मंदीची भीती निर्माण झाली. ट्रम्प यांनी या आठवड्यात जाहीर केलेल्या विस्तृत करांमुळे बाजारांमध्ये घबराट निर्माण झाली आहे आणि प्रमुख अर्थव्यवस्थांकडून प्रतिकारात्मक पावले उचलली गेली आहेत. त्यात चीनचादेखील समावेश आहे. युरोपीय बँकिंग स्टॉक्सने शुक्रवारी कोरोना महामारीच्या प्रकोपानंतर पाच वर्षांतील सर्वात मोठी घसरण अनुभवली.

3 एप्रिल रोजीही झाली होती मोठी घसरण

दरम्यान, गुरुवारी 3 एप्रिल रोजीही नॅसडॅक 100 स्टॉक इंडेक्समधून $1.4 ट्रिलियन मार्केट कॅपिटलायझेशन कमी झाले. डाऊ जोन्स इंडस्ट्रियल एव्हरेज 1130 पॉइंट्स किंवा 2.8 टक्क्यांनी खाली गेले. यामुळे गुरुवारी 1679.39 पॉइंट्स घसरण झाली होती. S&P 500 मध्ये 3.2 टक्के घसरण झाली तर नॅसडॅक कॉम्पोजिटने 3.5 टक्के घसरण नोंदवली होती. गुरुवारी, नॅसडॅक 6% घसरला होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news