

राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय निश्चित झाल्यानंतर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान मोदींनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले की, 'माझे मित्र डोनाल्ड ट्रम्प यांचे ऐतिहासिक निवडणुकीतील विजयाबद्दल हार्दिक अभिनंदन. तुम्ही तुमच्या मागील कार्यकाळातील यशाचा आधार घेत असताना, मी भारत-अमेरिका संबंध आणि धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करण्यासाठी आमच्या सहकार्याची अपेक्षा करतो. आपण सर्वांनी मिळून आपल्या लोकांच्या भल्यासाठी काम करूया आणि जागतिक शांतता, स्थिरता आणि समृद्धीला प्रोत्साहन देऊ या.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय निश्चित झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प पत्नी मेलानिया ट्रम्प यांच्यासह त्यांच्या समर्थकांमध्ये पोहोचले. ट्रम्प यांनी यावेळी सर्व मतदारांचे आभार मानले. हा इतिहासातील सर्वात मोठा राजकीय क्षण असल्याचे ट्रम्प म्हणाले.
अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाले आहेत. या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प विजयी झाल्याची घोषणा अमेरिकन मीडिया हाऊस फॉक्स न्यूजने केली आहे.
कमला हॅरिस अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या शर्यतीत मागे पडल्या आहेत. इलेक्टोरल कॉलेजच्या मतमोजणी ट्रेंडमध्ये कमला हॅरिस २१४ जागांवर अडकल्या आहेत, तर डोनाल्ड ट्रम्प २४७ जागांवर आघाडीवर आहेत. म्हणजेच आता २७० चा जादुई आकडा गाठण्यासाठी ट्रम्प यांना आणखी २३ जागांची गरज आहे.
अमेरिकेत सुरू असलेल्या अध्यक्षीय निवडणुकीच्या मतमोजणीच्या ट्रेंडनुसार डोनाल्ड ट्रम्प आता विजयापासून फक्त ४० जागा दूर आहेत. जर ट्रम्प आणखी ४० इलेक्टोरल कॉलेज जिंकण्यात यशस्वी झाले तर ते जादूई आकड्याला (२७०) स्पर्श करतील.
कमला हॅरिस यांनी एकापाठोपाठ तीन राज्ये जिंकली आहेत. त्यांनी कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन आणि आयडाहो तसेच न्यू मेक्सिको आणि ओरेगॉनमध्ये विजय मिळवला. या पाच राज्यांतील विजयासह हॅरिस यांना आतापर्यंत २०५ इलेक्टोरल मते मिळाली आहेत. आता १९ राज्यांमध्ये त्यांची आघाडी आहे. तर डोनाल्ड ट्रम्प २३० इलेक्टोरल मतांसह २७० च्या बहुमताच्या जवळ आहेत. रिपब्लिकन पक्ष आतापर्यंत २८ राज्यांमध्ये आघाडीवर आहे.
आतापर्यंतच्या मतमोजणीत कमला हॅरिस १९२ जागांवर आघाडीवर आहेत, तर डोनाल्ड ट्रम्प २३० जागांवर आघाडीवर आहेत. दरम्यान, ७ स्विंग राज्यांची स्थिती काय आहे, जाणून घ्या...
ऍरिझोना - ट्रम्प आघाडीवर आहेत
जॉर्जिया - ट्रम्प आघाडीवर आहेत
मिशिगन - हॅरिस आघाडीवर
नेवाडा - अद्याप कोणतेही परिणाम नाहीत
नॉर्थ कॅरोलिना - ट्रम्प यांचा विजय
पेनसिल्व्हेनिया - ट्रम्प आघाडीवर आहेत
विस्कॉन्सिन - ट्रम्प आघाडीवर आहेत
डोनाल्ड ट्रम्प यांना आघाडी मिळालेल्या २२ राज्यांमध्ये वायोमिंग, वेस्ट व्हर्जिनिया, टेक्सास, टेनेसी, साउथ डकोटा, साउथ कॅरोलिना, ओक्लाहोमा, ओहायो, नेब्रास्का, नॉर्थ डकोटा, मिसिसिपी, लुईझियाना, केंटकी, इंडियाना, फ्लोरिडा, आर्कान्सा, अलाबामा, आयोवा, मिसूरी, उटाह, वेस्ट व्हर्जिनिया आणि मोंटाना यांचा समावेश आहे. ट्रम्प यांना या राज्यांमधून २१० इलेक्टोरल कॉलेज मते मिळत आहेत.
आतापर्यंत झालेल्या मतमोजणीत रिपब्लिकन पक्षाचे डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या प्रतिस्पर्धी डेमोक्रॅट पक्षाच्या कमला हॅरिस यांच्यावर मोठी आघाडी घेतली आहे. ट्रम्प सध्या २० राज्यांमध्ये विजयाच्या वाटेवर आहेत. त्याचबरोबर हॅरिस यांनी आतापर्यंत केवळ ११ राज्यांमध्ये आघाडी घेतली आहे. डोनाल्ड ट्रम्प यांना १९८ इलेक्टोरल कॉलेज मते मिळाली आहेत, तर कमला हॅरिस यांना ११२ इलेक्टोरल कॉलेज मते मिळाली आहेत. अमेरिकेतील ५३८ इलेक्टोरल कॉलेजच्या मतांपैकी २७० मते जिंकणाऱ्याला राष्ट्राध्यक्षपद मिळते.
डेमोक्रॅट सारा मॅकब्राइड यूएस हाऊस ऑफ रिप्रेझेंटेटिव्हमध्ये निवडून आलेल्या पहिल्या ट्रान्सजेंडर बनल्या आहेत. डेलावेअरच्या महत्त्वाच्या जागेवरून त्यांनी निवडणूक जिंकली आहे. दरम्यान, रिपब्लिकन डोनाल्ड ट्रम्प यांनी १९८ इलेक्टोरल कॉलेजमध्ये आघाडी घेतली आहे. त्याचबरोबर डेमोक्रॅट पक्षाच्या कमला हॅरिस ९९ जागांवर आघाडीवर आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांना ज्या १७ राज्यांमध्ये आघाडी मिळाली आहे. त्यात वायोमिंग, वेस्ट व्हर्जिनिया, टेक्सास, टेनेसी, साउथ डकोटा, साउथ कॅरोलिना, ओक्लाहोमा, ओहायो, नेब्रास्का, नॉर्थ डकोटा, मिसिसिपी, लुईझियाना, केंटकी, इंडियाना, फ्लोरिडा, आर्कान्सा, अलाबामा यांचा समावेश आहे. आहेत. ट्रम्प यांना या राज्यांमधून १७८ इलेक्टोरल कॉलेज मते मिळत आहेत.
कमला हॅरिस यांना आघाडी मिळालेल्या नऊ राज्यांमध्ये कनेक्टिकट, डेलावेअर, इलिनॉय, मॅसॅच्युसेट्स, मेरीलँड, न्यू जर्सी, न्यूयॉर्क, रोड आयलँड आणि व्हरमाँट यांचा समावेश आहे. त्यांना या राज्यांमधून ९९ इलेक्टोरल कॉलेज मते मिळत आहेत.
US Presidential Election Live Updates | अमेरिकेत अध्यक्षीय निवडणुकीसाठी मंगळवारी ५ नोव्हेंबर रोजी मतदान झाले. या निवडणुकीत रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प आणि डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यात मुख्य लढत आहे. अनेक राज्यांमध्ये मतदान संपल्यानंतरच मतमोजणी सुरू झाली असून निकालही येऊ लागले आहेत. जाणून घ्या लाईव्ह अपडेट्स...