Kamla Haris: अमेरिकन राष्ट्राध्यक्ष निवडणूक; कमला हॅरिस 'डेमोक्रॅटिक'च्या अधिकृत उमेदवार

सोशल मिडिया हॅन्डल एक्सवर पोस्ट करून दिली माहिती
Kamala Haris
कमला हॅरिसPudhari File Phtoo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी अधिकृत डेमोक्रॅटिक उमेदवार बनल्या आहेत. सोशल मिडिया हॅन्डल एक्सवर पोस्ट करून त्यांनी ही माहिती दिली. आनंदही व्यक्त केला. डेमोक्रॅटिक नॅशनल कमिटीने शुक्रवारी (दि.2) सांगितले की, डेमोक्रॅटिक पक्षाचे उमेदवारी मिळवण्यासाठी उपराष्ट्रपती कमला हॅरिसने पुरेशी प्रतिनिधी मते मिळवली आहेत, ज्यामुळे हॅरिस या प्रमुख राजकीय तिकिटावर सर्वोच्च स्थान मिळविणाऱ्या पहिल्या कृष्णवर्णीय महिला झाल्या आहेत.(Kamla Haris)

Kamla Haris | कमला हॅरिस यांची एक्सवर पोस्ट

कमला हॅरिस यांनी एक्स वर लिहिले आहे, 'युनायटेड स्टेट्सच्या राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक उमेदवार म्हणून मी सन्मानित आहे. मी पुढील आठवड्यात अधिकृतपणे नामांकन स्विकारणार आहे. ही मोहीम देशभक्तीने ओतप्रोत असलेल्या लोकांबद्दल आहे आणि त्यांच्या सर्वोत्तम स्थानासाठी लढा देत आहे.

Summary

जो बायडन यांचा उघड पाठिंबा

जो बायडन यांनी निवडणुकीतून माघार घेण्यापूर्वीच डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात कमला हॅरिस या जो बायडन यांच्यापेक्षा अधिक पात्र आहेत की नाही, याची चर्चा जोर धरू लागली होती. यानंतर जो बायडन यांनी अध्यक्षपदाच्या निवडणुकीतून माघार घेत कमला हॅरिस यांना उघडपणे पाठिंबा दिला. अमेरिकेचे हित लक्षात घेऊन हा निर्णय घेत असल्याचेही त्यांनी सांगितले. सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या पत्रात बायडन म्हणाले की, 'तुमचे राष्ट्रपती म्हणून काम करणे हा माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा सन्मान आहे. मी पुन्हा निवडणुकीसाठी उभे राहण्याचा मानस आहे, परंतु मला विश्वास आहे की मी माघार घेणे आणि माझ्या उर्वरित कार्यकाळासाठी अध्यक्ष म्हणून माझे कर्तव्य पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करणे माझ्या पक्षाच्या आणि देशाच्या हितासाठी आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news