नियतीने 'दिले' आगीने 'हिरावले'..! सर्वात मोठ्या लॉटरी विजेत्याचा बंगला आगीत भस्‍मसात

लॉस एंजेलिसमधील आगीतील मृतांची संख्‍या ११ वर
California wildfire updates
एडविन कॅस्ट्रो यांनी फेब्रुवारी २०२४ मध्‍ये २.०४ अब्ज डॉलर्स (१६,५९० कोटी रुपये) चे जगातील सर्वात मोठे लॉटरी बक्षीस जिंकलं होतं. या पैशातून त्‍यांनी हॉलिवूड हिल्सवरील एका आलिशान बंगला तब्‍बल र २५.५ दशलक्ष डॉलर्स खर्चून विकत घेतला होता. (Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : आपण अब्‍जाधीश होवू असे त्‍याला स्‍वप्‍नातही वाटलं नव्‍हतं;पण न पाहिलेलं स्‍वप्‍न वास्‍तवात उतरलं... एका क्षणात तो अब्‍जाधीश झाला... तब्‍बल २.०४ अब्ज डॉलर्स (१६,५९० कोटी रुपये)चे जगातील सर्वात मोठे लॉटरी बक्षीस त्‍याने जिंकलं. त्‍याचे सारं आयुष्‍यच बदललं. त्‍याने तब्‍बल २५.५ दशलक्ष डॉलर्स खर्चून आपला स्‍वप्‍नातील बंगलाही खरेदी गेला. अवघ्‍या काही महिन्‍यात नियतीने फासे पलटले. नशीबाने दिलेला बंगला लॉस एंजेलिसमधील आगीत भस्‍मसात झाला. या संदर्भातील वृत्त 'द न्यू यॉर्क पोस्ट'ने दिले आहे.

कॅलिफोर्नियातील एडविन कॅस्ट्रो यांनी फेब्रुवारी २०२४ मध्‍ये २.०४ अब्ज डॉलर्स (१६,५९० कोटी रुपये) चे जगातील सर्वात मोठे लॉटरी बक्षीस जिंकलं होतं. या पैशातून त्‍यांनी हॉलिवूड हिल्सवरील एका आलिशान बंगला तब्‍बल र २५.५ दशलक्ष डॉलर्स खर्चून विकत घेतला होता. कॅस्ट्रो यांचे कोट्यवधी डॉलर्सचा बंगाल आगीत भस्‍मसात झाला आहे. आता येथे केवळराखेचे ढिगारे उरले आहेत. बंगलात केवळ काँक्रीटचे खांब आणि धुमसणारे लाकूड शिल्लक राहिले आहेत.

लॉस एंजलिसमध्‍ये लागलेल्‍या आगीत गायिका एरियाना ग्रांडे, अभिनेता डकोटा जॉन्सन आणि जिमी किमेल यांच्यासह प्रमुख सेलिब्रिटींची बंगल्‍यांचीही राखरांगोळी झाली आहे.

आगीतील मृतांची संख्‍या ११ वर, आरोग्य आणीबाणी जाहीर

लॉस एंजेलिसमधील उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या भयानक वणव्यांमध्ये मंगळवारपासून ११ जणांचा मृत्यू झाला आहे. हजारो घरे, वाहने आणि रस्ते नष्ट झाले आहेत. या वणव्यांमुळे हवा धोकादायक बनली आहे. रहिवाशांसाठी आरोग्याचे मोठे धोके निर्माण झाले आहेत, त्यामुळे आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news