US Iran conflict | अमेरिका-इराणमध्ये पुन्हा युद्धाची भीती; खार्ग बेटावर संभाव्य हल्ल्याची तयारी

US Iran conflict |
US Iran conflict | अमेरिका-इराणमध्ये पुन्हा युद्धाची भीती; खार्ग बेटावर संभाव्य हल्ल्याची तयारी
Published on
Updated on

दुबई; वृत्तसंस्था : वॉशिंग्टन आणि तेल अवीव हे तेहरानविरुद्ध (इराणविरुद्ध) नवीन लष्करी पर्यायांची तयारी करत असल्याचे वृत्त समोर आल्यानंतर शनिवारी अमेरिका-इराणदरम्यान पुन्हा युद्ध भडकण्याची भीती तीव्र झाली आहे. यामध्ये इराणचे सर्वात महत्त्वाचे तेल निर्यात केंद्र असलेल्या खार्ग बेटावर संभाव्य हल्ल्याची शक्यता व्यक्त होत आहे.

अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ट्रुथ सोशलवर ‘वादळापूर्वीची शांतता’ असा इशारा देणारे एक सूचक, एआय-जनरेटेड चित्र शेअर केले. या ग्राफिक्समध्ये ट्रम्प अमेरिकन नौदल प्रमुखांसोबत (अ‍ॅडमिरल) वादळी समुद्रासमोर उभे असलेले दिसत आहेत. या समुद्रात युद्धनौका तैनात आहेत आणि त्यातील एका नौकेवर इराणचा ध्वज आहे. ट्रम्प यांनी आणखी एक व्हिडीओ क्लिप पोस्ट केली. त्यामध्ये एक अमेरिकन विनाशिका इराणचे विमान पाडताना दिसत आहे. यामुळे आठवडाभराच्या रखडलेल्या मुत्सद्दीपणानंतर लष्करी कारवाईचा पर्याय पुन्हा एकदा विचाराधीन असण्याच्या चर्चांना उधाण आले आहे.

चर्चा निष्फळ तणाव वाढला

चीनच्या पाठिंब्याने आणि पाकिस्तानच्या मध्यस्थीने सुरू असलेल्या वाटाघाटी फिस्कटल्यानंतर ही नवीन तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. या वाटाघाटींद्वारे तात्पुरत्या युद्धविरामाचे रूपांतर एका व्यापक करारात करण्याचा प्रयत्न होता, ज्यामध्ये इराणचा अणू कार्यक्रम आणि होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली करण्याचा समावेश होता.

ऑपरेशन एपिक फ्युरी 2.0

‘द न्यूयॉर्क टाईम्स’ आणि इस्रायली प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, युनायटेड स्टेटस् आणि इस्रायल संभाव्य युद्धासाठी आतापर्यंतची सर्वात तीव्र तयारी करत आहेत. या चर्चेच्या केंद्रस्थानी ‘ऑपरेशन एपिक फ्युरी 2.0’ असल्याचे काही अधिकार्‍यांचे म्हणणे आहे.लष्करी नियोजक विविध पर्यायांची चाचपणी करत असल्याचे या वृत्तात म्हटले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news