US- Iran sign peace deal : ‘फारसी’ भाषेतील शांतता करारावर केली डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी!

इराणने आपली भाषा - संस्कृती आपल्यासाठी सर्वोच्च असल्याचा जगाला दिला संदेश, अमेरिका- इराणमधील शांतता करार दोन भाषेत
US- Iran sign peace deal : फारसी भाषेतील शांतता करारावर केली डोनाल्ड ट्रम्प यांनी  स्वाक्षरी!
US- Iran sign peace deal : फारसी भाषेतील शांतता करारावर केली डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वाक्षरी!
Published on
Updated on

Donald Trump Sign अमेरिका आणि इराणमध्ये शांतता करारावर डोनाल्ड ट्रम्प व इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियान यांनी स्वाक्षरी केली आहे. फ्रान्समधील व्हर्साय येथे सुरू असलेल्या जी-७ परिषदेदरम्यान, फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांच्यासोबत झालेल्या एका विशेष डिनर दरम्यान ट्रम्प यांनी या करारावर स्वाक्षरी केली. पण ज्या करारावर ट्रम्प यांनी स्वाक्षरी केली तो करार इराणची राष्ट्रभाषा फारसीमध्ये होता. तर कराराचा दुसरा मसुदा इंग्रजी भाषेत होता.

हा शांतता करार इंग्रजी व फारसी अशा दोन्ही भाषेत केले होते. या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर इराणने आपली संस्कृती, भाषा कायम टिकून राहील हा संदेश दिल्याचे राजकीय जाणकार म्हणत आहेत. कारण ज्यावेळी इराण - अमेरिका युद्ध सुरु झाले त्‍यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी आज एका संस्कृतीचा अंत होणार आहे असे म्हटले होते. ७ एप्रिल २०२६ रोजी ट्रम्प यांनी म्हटले होते की A whole civilization will die tonight, never to be brought back again. I don't want that to happen, but it probably will आज एक पूर्ण संस्कृती संपणार आहे जी पुन्हा कधीही परत येणार नाही.

इराणने धरला दोन्ही भाषांचा आग्रह

फ्रान्समधी व्हर्साय येथे जेव्हा ट्रम्प यांनी शांतता करारवर सही केली त्‍यावेळी त्‍यांनी इराणची राष्ट्रभाषा फारसीमध्ये तयार केलेल्या मसुद्यावर सही केली आहे. हा करार जगाच्या दृष्टीने खूप महत्‍वाचा होता. तसेच संवेदनशिलही होता अटी शर्ती दोन्ही देशांना मान्य झाल्या पाहिजे होत्‍या. तसेच इराणने हा मसुदा तयार करताना फारसी भाषेचाही आग्रह धरला होता. कारण फारसी संस्कृतीचा इराणला अभिमान आहे.करार करताना त्‍यातील मुद्ये बदलू शकतील किंवा त्‍याचा वेगळा अर्थ काढला जाऊ शकतो त्‍यामुळे त्‍यांनी हा आग्रह धरला. तसेच फारसी भाषेतील करारामुळे करारातील मुद्ये समजण्यासाठी इराणला व तेथील जनतेला अधिकाअधिक स्पष्टता मिळाली. यामुळे इंग्रजी व फारसी भाषेत हा मसुदा तयार करण्यात आला, तसेच व्हाईट हाऊस व इराणच्या मिडीयाने जे फोटो प्रसिद्ध केले आहेत त्‍यात ट्रम्प हे फारसी भाषेतील करारावर सही करताना दिसत आहेत.

फ्रान्समधील ज्या व्हर्साय येथे या करारावर स्वाक्षरी करण्यात आली त्‍याचठिकाणी पहिल्या महायुद्ध थांबवण्यासाठी करार करण्यात आला होता. या करारातील काही मुद्यांमूळेच पुढे दुसरे महायुद्ध भडकले असे म्हटले जाते.

US- Iran sign peace deal : फारसी भाषेतील शांतता करारावर केली डोनाल्ड ट्रम्प यांनी  स्वाक्षरी!
US Iran peace deal: आजच शांतता करारावर स्वाक्षरी होणार? ट्रम्प यांच्या दाव्यावर इराणची पहिली प्रतिक्रिया

इराणने दिला जगाला संदेश

गेले तीन महिने सुरु असलेल्या या युद्धामुळे सर्व जगास वेठीस धरले होते. होर्मुझच्या सामुद्रधुनीतून जगाचा तेल व्यापार मोठ्या प्रमाणात होता तो ठप्प होता. पण आता शांतता करार झाल्यामुळे अनेक देशामध्ये तेलपूरवठा सुरळीत होईल. या युद्धामुळे इराणने आपली ताकद जगाला दाखवून दिली असे म्हणावे लागेल. तसेच अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना शांतता करारातील फारसी भाषेतील मसुद्यावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडून आपले महत्‍व अधोरेखित केले आहे. इराण संस्कृती, भाषा, हे आमच्यासाठी सर्वोच्च आहे असा संदेश दिला आहे.

काय असते शांतता करारावरील स्वाक्षरी प्रक्रिया

दोन देशांमध्ये जेव्हा करार केला जातो तेव्हा त्‍याच्या प्रमुख दोन प्रति तयार केल्या जातात. हे मसुदे दोन्ही देशांकडे दस्तऐवज म्हणून सुरक्षित ठेवले जातात. यावर राष्ट्राध्यक्ष, परराष्ट्र मंत्री यांच्या सह्या असतात. ज्या देशाकडे जी कराराची प्रत असते त्‍यावर पहिल्यांदा त्‍या देशाच्या राष्ट्राध्यक्षांचा स्वाक्षरी असते व त्‍यानंतर दुसऱ्या देशाच्या राष्ट्राध्यक्षांची स्वाक्षरी असते. त्‍यानंतर हा करार दोन्ही देश आपल्या संसदेत ठेवतात व त्‍याला अनुमोदन दिले जाते. त्‍यानंतर या कराराची प्रत युनायटेड नेशनमध्ये जमा केली जाते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news