

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेत भारतीय वंशाच्या पुरूषासह त्याच्या मुलीची गोळ्या घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. हत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. (US Indian-origin man)
प्रदीप कुमार पटेल आणि त्यांची मुलगी व्हर्जिनियातील लँकफोर्ड हायवेवर असलेल्या अॅकोमॅक काउंटीमधील एका दुकानात काम करत होते. गोळीबाराची घटना दुकानाच्या आतच घडली. २० मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता पोलिसांना गोळीबार झाल्याचा फोन आला. पोलीस घटनास्थळी पोहोचले तेव्हा प्रदीप कुमार पटेल (५६) मृत आढळले आणि त्यांची २४ वर्षांची मुलगी जखमी अवस्थेत आढळली. दोघांनाही गोळ्या घालण्यात आल्या होत्या.. उपचारादरम्यान मुलीचाही मृत्यू झाला.
आरोपी गुरुवारी सकाळी दारू खरेदी करण्यासाठी दुकानात पोहोचला आणि रात्री दुकान का बंद आहे असे विचारले. त्यानंतर त्याने वडील-मुलीवर गोळीबार केला. प्रदीप पटेलचा जागीच मृत्यू झाला तर त्याची मुलगी उर्मी हिचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.दुहेरी हत्याकांडप्रकरणी पोलिसांनी जॉर्ज फ्रेझियर डेव्हॉन व्हार्टन (४४) याला अटक केली. आहे. हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांकडून आरोपीची चौकशी सुरू आहे. भारतीय वंशाच्या पिता-पुत्राच्या हत्येची बातमी सोशल मीडियावर पसरताच अमेरिकेतील भारतीय वंशाच्या लोकांमध्ये शोककळा पसरली आहे.