न्यूयॉर्क: पुढारी ऑनलाईन
भारतीय वंशाचे गणितज्ञ अक्षय वेंकटेश यांना 'फिल्डस मेडल' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. 'फिल्डस मेडल'ला गणित क्षेत्रातील नोबेल पुरस्कार मानले जाते. ब्राझीलची राजधानी रियो डी जानीरो येथे झालेल्या गणितज्ञांच्या आंतरराष्ट्रीय काँग्रेसमध्ये वेंकटेश याना हा पुरस्कार देण्यात आला.
वेंकटेश यांनी वयाच्या अवघ्या १३व्या वर्षी वेस्टर्न ऑस्ट्रेलिया विद्यापीठातून गणित आणि फिजिक्समधून पदवी मिळली होती. 'फिल्डस मेडल' हा पुरस्कार दर चार वर्षांनी एकदा दिला जातो. वेंकटेश सध्या स्टॅनफर्ड विद्यापीठात प्राध्यापक आहेत. यंदाच्या वर्षी हा पुरस्कार चौघांना मिळाला आहे. यात केंब्रिज विद्यापीठतील प्राध्यापक कौचर बिरकर, स्वीस फेडरल इस्टूट्यूट ऑफ टेक्नोलॉजीच्या एलिसो फिगाली आणि बॉन विद्यापीठातील पीटर स्कूल्ज यांचा समावेश आहे. सर्व विजेत्यांना सोन्याचे पदक आणि १५ हजार डॉलर रोख पुरस्कार मिळणार आहेत.
'फिल्डस मेडल' पुरस्कार मिळवणारे वेंकटेश भारतीय वंशाचे दुसरे गणितज्ञ आहेत. याआधी २०१४मध्ये मंजुल भार्गव यांना हा पुरस्कार मिळाला होता.