मोठी दुर्घटना! अमेरिकेत ६० प्रवासी असलेले विमान हेलिकॉप्टरला धडकले, १८ ठार

US Jet Crash | घटनास्थळी बचावकार्य सुरु
US Jet Crash
अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये ६० प्रवासी असलेले एक जेट विमान आणि आर्मीच्या हेलिकॉप्टरची बुधवारी रात्री हवेतच धडक झाली.(source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : अमेरिकेतील वॉशिंग्टन डीसीमध्ये ६० प्रवासी असलेले एक जेट विमान आणि आर्मीच्या हेलिकॉप्टरची बुधवारी रात्री हवेतच धडक झाली. या अपघातानंतर विमान आणि हेलिकॉप्टर दोन्हीही पोटोमॅक नदीत कोसळले. घटनास्थळी बचावकार्य सुरु आहे. ही घटना वॉशिंग्टन डीसीच्या बाहेर असलेल्या रेगन नॅशनल विमानतळाजवळ घडली. यामुळे रेगन विमानतळावरील सर्व विमान उड्डाणे आणि लँडिंग थांबवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

सीबीएसच्या न्यूजच्या वृत्तानुसार, पोटोमॅक नदीत बचावकार्य सुरु असून बुधवारी रात्री किमान १८ मृतदेह सापडले आहेत.

फेडरल विमान वाहतूक प्रशासन आणि संरक्षण अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेगन नॅशनल विमानतळाजवळ ६४ जणांना घेऊन जाणारे एक प्रवासी विमान धावपट्टीजवळ येत असताना आर्मी ब्लॅक हॉक हेलिकॉप्टरशी हवेत धडकले.

मेट्रोपॉलिटन पोलिस विभागाच्या म्हणण्यानुसार, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याची पुष्टी झालेली नाही. घटनास्थळी आपत्कालीन मदतकार्य सुरू आहे.

विमानात ६० प्रवासी, हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक

एअरलाइन्सने दिलेल्या माहितीनुसार, अमेरिकन एअरलाइन्स फ्लाइट ५३४२ हे विमान ६० प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्ससह विचिटा, कनसास येथून निघाले होते. तर हेलिकॉप्टरमध्ये तीन सैनिक होते.

सीबीएस न्यूजच्या वृत्तानुसार, स्थानिक वेळेनुसार रात्री ९ वाजण्याच्या सुमारास रेगन वॉशिंग्टन राष्ट्रीय विमानतळावर रनवे ३३ जवळ जात जाताना पीएसए (PSA) एअरलाइन्सचे बॉम्बार्डियर CRJ700 हे प्रादेशिक ‍विमान हवेतच सिकोर्स्की H-60 ​​हेलिकॉप्टरला धडकले," असे फेडरल एव्हिएशन ॲडमिनिस्ट्रेशनने जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे.

पोटोमॅक नदीत शोध आणि बचावकार्य सुरु

या अपघातानंतर पोटोमॅक नदीत शोध आणि बचाव कार्य सुरु आहे. यात यूएस पार्क पोलिस, डीसी मेट्रोपॉलिटन पोलिस विभाग आणि अमेरिकन सैन्यासह अनेक एजन्सींचा सहभाग असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे. डीसी फायर आणि ईएमएस विभागाने म्हटले आहे की अग्निशमन नौका घटनास्थळी तैनात करण्यात आल्या आहेत.

डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केले निवेदन

राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जारी केलेल्या एका निवेदनात म्हटले आहे की, त्यांना या अपघाताची पूर्ण माहिती मिळाली आहे. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो. आमच्या पहिल्या प्रतिसादकर्त्यांनी केलेल्या अविश्वसनीय कामाबद्दल त्यांना धन्यवाद. मी अपघाताच्या परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे आणि अधिक तपशील देत राहीन.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news