भारतानंतर अमेरिकेचाही चीनला झटका; टिकटॉकवर आणणार बंदी

वाश्गिंटन: पुढारी ऑनलाईन

भारताने टिकटॉकसह ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातल्यानंतर आता अमेरिकादेखील चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याच्या तयारीत असल्याचे वृत्त समोर आले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री माइक पोम्पिओ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. 

माइक पोम्पिओ यांनी अमेरिका टिकटॉकसह अन्य चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार करत असल्याचे म्हटले आहे. मात्र या विषयासंदर्भात राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा झालेली नाही, काही ठरलेले नाही. पण अमेरिका चिनी अ‍ॅप्सवर बंदी घालण्याचा विचार निश्चित करत असल्याचे पोम्पिओ यांनी नमूद केले आहे. 

भारत-चीन तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने ५९ चिनी अ‍ॅप्सवर बंदी घातली. बंदी घातलेल्या अ‍ॅप्समध्ये लोकप्रिय टिकटॉक अ‍ॅपचा समावेश आहे. भारतात टिकटॉकवर बंदी घातल्यामुळे या ॲपची मूळ कंपनी बाईट डान्सला कोट्यावधीचे नुकसान झाले आहे. चीनचे सरकारी वृत्तपत्र ग्लोबल टाइम्सने टिकटॉक बंदीमुळे बाईट डान्स कंपनीचे ४५ हजार कोटींहून अधिक रुपयांचे अधिक नुकसान झाल्याचे म्हटले आहे. हॅलो आणि टिकटॉकवरील बंदीमुळे संबंधित कंपनीच्या व्यवसायावर मोठा परिणाम होणार असल्याचे नमूद केले आहे.

 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news