‘युनिफॉर्म फोर्स’ करणार दहशतवाद्यांचा सफाया

चीन सीमेवरून लवकरच वापसी; जम्मू-काश्मीरमध्ये होणार तैनात
Uniform Force" will be deployed on the Line of Control to wipe out the terrorists
दहशतवाद्यांचा सफाया करण्यासाठी नियंत्रण रेषेवर ‘युनिफॉर्म फोर्स’ तैनात करण्यात येणार.Pudhari File Photo
Published on
Updated on

पाकिस्तानातून जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरी करणार्‍या दहशतवाद्यांचा सफाया करण्यासाठी नियंत्रण रेषेवर ‘युनिफॉर्म फोर्स’ तैनात करण्यात येणार आहे. चीनसोबतच्या गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर हे दल लडाखमध्ये पाठविण्यात आले होते. आता पुन्हा ‘युनिफॉर्म फोर्स’ला जम्मूमध्ये पाचारण करण्यात येत आहे.

लडाख सीमेवरील गलवान खोर्‍यात चीनने कुरापत काढल्यानंतर 2020 साली जम्मूतील ‘युनिफॉर्म फोर्स’मधील जवानांना पूर्व लडाखमध्ये तैनात करण्यात आले होते.

भारत-चीनमधील सीमावादावर बोलणी सुरू असून, सीमेवर शांतता राखण्यासाठी दोन्ही देशांनी 75 टक्के सहमती दर्शविली आहे. चीनने सीमेवरील सैन्य माघारी बोलावले आहे.

अलीकडच्या काळात जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे ‘युनिफॉर्म फोर्स’ला जम्मूमध्ये पुन्हा तैनात करण्यात येणार आहे.

एलएसीवर ‘युनिफॉर्म फोर्स’ तैनात केल्यानंतर काश्मीरमधील दहशतवादी हल्ल्यांत वाढ झाली होती. त्यामुळे हे दल पुन्हा सक्रिय होणार असल्याने दहशतवाद्यांना चाप बसणार आहे.

पूर्व लडाखमध्ये तैनात तुकडीमध्ये पुनर्रचना करण्यात येणार आहे. यानंतर पुढच्या वर्षी ‘युनिफॉर्म फोर्स’ला जम्मूमध्ये पाचारण करण्यात येणार असल्याचे समजते.

18,000

राष्ट्रीय रायफल्स फोर्सअंतर्गत ‘युनिफॉर्म फोर्स’ची तुकडी कार्यरत असते. शत्रुराष्ट्रांच्या कारवायांना थेट प्रत्युत्तर देण्याची जबाबदारी या तुकडीवर असते. या दलात साधारणत: 18 हजार जवानांचा समावेश असतो. लष्कराकडे हल्ला करण्यासाठी चार ते पाच स्ट्राईक कोर आहेत. लष्कर, पोलिस, गुप्तचर यंत्रणेसोबत समन्वय ठेवून ‘युनिफॉर्म फोर्स’चे कार्य चालते.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news