

वॉशिंग्टन/मॉस्को : वृत्तसंस्था युक्रेनकडून सुरू असलेल्या ड्रॅगन ड्रोन हल्ल्यांनी आधीच भयचकीत असलेल्या रशियाविरुद्ध युक्रेनकडून लवकरच दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर शक्य आहे. सीएनएनच्या वृत्तानुसार, अमेरिका आणि ब्रिटन युक्रेनला या शस्त्रांच्या वापराची परवानगी देण्यावर विचार करत आहेत. दुसरीकडे रशियन राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी तसे घडल्यास नाटो देशांनीच रशियाविरुद्ध युद्ध पुकारले, असे मानले जाईल व रशिया जोरदार प्रत्युत्तर देईल, असा इशारा दिला आहे.
दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची युक्रेनवरील बंदी उठवणे याचा अर्थ नाटोच रशियाविरुद्ध युद्धात उतरले आहे, हे उघड आहे, असे अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटनी ब्लिंकन आणि ब्रिटनचे परराष्ट्र मंत्री डेव्हिड लॅमी या दोघांनी युक्रेनला भेट दिली होती. दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याची परवानगी तुम्हाला लवकरच मिळेल, असा शब्द युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांना दिला होता.
पुतीन एका दूरचित्रवाहिनीशी बोलताना म्हणाले. एकतर दीर्घ पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा वापर अमेरिकेकडून परवानगी शक्य; मग युद्ध 'नाटो' विरुद्ध : पुतीन रशियाच्या लष्करी तळांविरुद्ध दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याबाबत युक्रेनवर असलेली बंदी आम्ही उठवणार आहोत. अँटनी ब्लिंकन, परराष्ट्र मंत्री, अमेरिका उपग्रहाशिवाय शक्य नाही. युक्रेनकडे हे तंत्रज्ञान नाही.
युरोपियन युनियन किंवा अमेरिकन उपग्रहाच्या मदतीनेच युक्रेनला असा हल्ला करता येईल. पुन्हा त्यासाठीच तंत्रशुद्ध सैन्यबळही युक्रेनकडे नाही. नाटोचेच प्रशिक्षित सैनिक हे सगळे करतील. रशियावर युक्रेनकडून असे क्षेपणास्त्र हल्ले झाले, तर ते युक्रेनने केलेले नाहीत, असेच मी मानेन आणि अमेरिका, ब्रिटनविरुद्ध आम्ही युद्धाचा बिगूल वाजवू, असेही पुतीन म्हणाले.
रशियाच्या लष्करी तळांविरुद्ध दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे वापरण्याबाबत युक्रेनवर असलेली बंदी आम्ही उठवणार आहोत.
अँटनी ब्लिंकन, परराष्ट्र मंत्री, अमेरिका