ब्रिटनमध्‍ये 'कंझर्व्हेटिव्ह' विरुद्ध 'लेबर'मध्‍ये चुरशीची लढत

सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदानास प्रारंभ
UK general elections
ब्रिटनमध्‍ये सार्वत्रिक निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांचा कंझर्व्हेटिव्ह पार्टी ( हुजूर पक्ष ) विरुद्‍ध कीर स्टारमर यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील लेबर पार्टी ( मजूर पक्ष) आमने-सामने आहेत. Twitter
Published on
Updated on

ब्रिटनमध्‍ये सार्वत्रिक निवडणुकांसाठीच्‍या मतदानास आज (दि.४) सकाळी प्रारंभ झाला. या निवडणुकीत विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांचा कंझर्व्हेटिव्ह पार्टी ( हुजूर पक्ष ) विरुद्‍ध कीर स्टारमर यांच्‍या नेतृत्त्‍वाखालील लेबर पार्टी ( मजूर पक्ष) यांच्‍यात चुरशीची लढत आहेत. ब्रिटनमध्‍ये गेली १४ वर्ष कंझर्व्हेटिव्ह पक्षाची सत्ता आहे.

ऋषी सुनक त्यांच्या कार्यकाळाची मुदत सहा महिने बाकी होती. त्‍यापूर्वीच निवडणुकीची घोषणा करण्‍यात आली. आज मतदानाला सकाळी ७ वाजता प्रारंभ झाला. रात्री १० वाजेपर्यंत मतदारांना आपला हक्‍क बजावता येणार आहे. ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीत आर्थिक समस्‍या, कर रचना आणि स्‍थलांतर यांसारखे मुद्दे ठळक राहिले आहेत. मागील सहा आठवडे देशभरात सर्वच प्रमुख राजकीय पक्षांची प्रचाराचा धुराळा उडवला होता. इंग्लंड, वेल्स, स्कॉटलंड आणि नॉर्दर्न आयर्लंडमधील एकूण 650 मतदारसंघातील मतदार या निवडणुकीत मतदान करतील. 650जागांपैकी 326 जागा जिंकणार्‍या पक्षाचा नेता पंतप्रधानपदी विराजमान होईल.

UK general elections
धर्म मला मार्गदर्शन करतो : ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक यांचे सूचक विधान

ऋषी सुनक पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत

कंझर्वेटिव्ह पक्षाचे नेते ऋषी सुनक पुन्हा एकदा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत आहेत. ऋषी सुनक हे ब्रिटनचे पहिले आशियाई आणि हिंदू पंतप्रधान आहेत.मात्र, आतापर्यंत त्‍यांच्‍यासमोरील आव्‍हान मोठे आहे. ब्रिटनमधील वाढत्या महागाईवर नियंत्रण ठेवण्याचा दावा ते करत आहेत.

UK general elections
UK PM Rishi Sunak | ब्रिटनचे PM ऋषी सुनक यांना मोठा धक्का, स्थानिक निवडणुकांत ‘कंझर्व्हेटिव्ह’चा ४० वर्षांतील सर्वात नामुष्कीजनक पराभव

कीर स्टारमर यांनी दिले सुनक यांना आव्‍हान

लेबर पक्षाचे नेते कीर स्टारमर हे माजी मानवाधिकार वकील आणि मुख्य सरकारी वकील आहेत. निवडणूकपूर्व सर्वेक्षणात त्‍यांच्‍या पक्षाने बहुमत मिळवण्याचा दावा केला आहे. कीर स्टारमर हे सार्वजनिक अभियोगांचे माजी संचालक आहेत. एप्रिल 2020 मध्ये त्यांनी लेबर पार्टीत प्रवेश केला होता. त्‍यांनी विद्यमान पंतप्रधान ऋषी सुनक यांच्‍यासमोर मोठे आव्‍हान निर्माण केले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news