वॉशिंग्टन/दमिश्क : सीरियन इस्लामिक स्टेट आणि अल-कायदा या दहशतवादी संघटनांच्या तळांवर अमेरिकेने हवाई हल्ले चढवले. त्यात दोन्ही संघटनांचे मिळून 37 दहशतवादी मारले गेले आहेत.
अमेरिकन लष्करातर्फे सोमवारी ही माहिती देण्यात आली. दोन वेगवेगळ्या दिवशी सीरियामध्ये या मोहिमा आम्ही राबवल्या, असेही लष्कराकडून सांगण्यात आले. मध्य सीरियामध्ये 16 सप्टेंबर रोजी ‘इसिस’च्या प्रशिक्षण केंद्रावर हवाई हल्ला करण्यात आला. त्यात 28 दहशतवादी मारले गेले. नंतर 24 सप्टेंबर रोजी अमेरिकन लष्कराने वायव्य सीरियावर केलेल्या हवाई हल्ल्यात ‘अल-कायदा’चे 9 दहशतवादी मारले गेले. याआधी अमेरिकेने फेब्रुवारीमध्येही सीरियातील अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले केले होते.
अब्द अल रऊफचा खात्मा
24 सप्टेंबरला मारल्या गेलेल्या एका दहशतवाद्याची ओळखही पटली आहे.
अब्द अल रऊफ असे त्याचे नाव असून, ‘अल-कायदा’ संघटनेचीच शाखा असलेल्या ‘हुर्रास अल-दीन’चा तो प्रमुख आहे.
सीरियातील संघर्ष
74% सुन्नी मुस्लिम आणि 10% शिया मुस्लिम असलेला सीरिया हा मुस्लिम बहुसंख्य देश आहे.
शिया मुस्लिम अल्पसंख्याक असूनही सीरियावर शिया नेता बशर अल-असदचे सीरियावर राज्य आहे.
बशरला हटवण्यासाठी सीरियातील सुन्नी मुस्लिम संघटना 2011 पासून संघर्ष करत आहेत.

