Trump Iran Threat | ट्रम्पने दिली इराणला धमकी; जागतिक शेअर बाजाराला धडकी

Trump Iran Threat |
Trump Iran Threat | ट्रम्पने दिली इराणला धमकी; जागतिक शेअर बाजाराला धडकी
Published on
Updated on

लंडन; वृत्तसंस्था : इराणवरील कडक इशार्‍यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलेल्या धमकीचा जागतिक बाजारांवर तत्काळ परिणाम दिसून आला. सोमवारी आशिया आणि युरोपमधील प्रमुख शेअर बाजारात मोठी घसरण झाली. जपानचा निक्केई निर्देशांक 3.4% घसरला, चीनचा सीएसआय 300 हा 2.8% खाली आला, तर दक्षिण कोरियाचा कोस्पी तब्बल 6.5% कोसळला. युरोपमध्येही परिस्थिती गंभीर होती. स्पेनचा आबेक्स 1.9%, फ्रान्सचा कॅक- 40 1.5%, जर्मनीचा डॅक्स 1.9% आणि ब्रिटनचा एफटीएसई 100 जवळपास 1.5% घसरला.

होर्मुझ सामुद्रधुनीवरून तणाव तीव्र

ट्रम्प यांनी इराणला 48 तासांत होर्मुझ सामुद्रधुनी खुली करण्याचा इशारा दिला आहे. ही सामुद्रधुनी जगातील सुमारे 20% तेल आणि गॅस वाहतुकीसाठी महत्त्वाची मानली जाते. इराणनेही प्रत्युत्तरात मध्यपूर्वेतील महत्त्वाच्या पायाभूत सुविधांवर हल्ल्याची धमकी दिली आहे.

या संघर्षामुळे जागतिक ऊर्जा बाजार हादरले आहेत. आंतरराष्ट्रीय ऊर्जा संस्थेचे प्रमुख फतिहज ब्रायरोल यांनी याची तुलना 1970 च्या तेल संकटाशी केली आहे. ब्रेंट क्रूडची किंमत 113 डॉलर प्रति बॅरलपर्यंत पोहोचली असून, यंदा सरासरी 85 डॉलर राहण्याचा अंदाज आहे. युक्रेमध्ये गॅस दर 3.1% वाढले आहेत.

महागाईचा दबाव; सोन्यालाही फटका

ऊर्जा दरवाढीमुळे महागाई वाढण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे व्याजदर वाढण्याची शक्यता असून, सोन्याच्या किमतीतही 5.8% घसरण झाली आहे.

इराण-यूएसए तणावामुळे जागतिक शेअर बाजारात मोठी घसरण

होर्मुझ सामुद्रधुनी बंद होण्याची भीती; ऊर्जा पुरवठ्यावर परिणाम

तेल 113 प्रति बॅरलपर्यंत; गॅस दरातही वाढ

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news