

Donald Trump On Massive Tariff :
डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताताच्या बाबतीत मोठं विधान करत खळबळ उडवून दिली आहे. त्यांनी भारताला जर तुम्ही रशियाकडून कच्च तेल खरेदी करणं सुरूच ठेवलं तर त्याचे मोठे परिणाम भोगावे लागतील अशी धमकीच दिली आहे. त्याचबरोबर त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः मला आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असं आश्वासन दिल्याचा पुनरूच्चार केला.
डोनाल्ड ट्रम्प यांनी गेल्या आठवड्यात, 'मी पंतप्रधान नरेंद्र मोदींशी बोललो आहे. त्यांनी आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार नाही असं सांगितलं आहे.' अस वक्तव्य केलं होतं. हे वक्तव्य त्यांनी एअर फोर्स वन विमानात असताना केलं होतं.
त्यानंतर भारतीय परराष्ट्र मंत्रालयानं याबाबत असं कोणतंही संभाषण झालं नसल्याचा खुलासा केला. यावर आता डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणतात, 'जर ते असं म्हणत असतील तर त्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. मात्र ते तसं करणार नाहीत.'
ट्रम्प यांच्या या वक्तव्यामुळं जे देश रशियासोबत उर्जा संसाधनांचा व्यापर करत आहे त्यांच्यावरील दबाव अजून वाढण्याची शक्यात आहे. अमेरिकेचा दावा आहे की तेलाच्या व्यापारातून जो पैसा रशियाला मिळतोय तो ते युक्रेनविरूद्धच्या युद्धात वापरत आहेत.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या टॅरिफ धोरणाचा भारताच्या व्यापारावर परिणाम होताना दिसत आहे. ट्रम्प यांनी भारतावर ५० टक्के टॅरिफ लावल्यानंतर भारताच्या निर्यात धोरणावर त्याचा परिणाम झाला. यात टेक्स्टाईल आणि फार्मास्युटिकल कंपन्यांच्या निर्यातीला फटका बसला आहे.
दरम्यान, भारतानं डोनाल्ड ट्रम्प यांच्या दाव्यांवर त्वरित प्रत्युत्तर देण्याची रणनिती आखली असून परराष्ट्र मंत्रालयानं आमचं उर्जा धोरण हे एकाच ध्येयावर आधारलं आहे ते म्हणजे भारतीय ग्राहकांचं हित! असं प्रत्युत्तर दिलं होतं. भारत हा जगातील कच्च तेल आणि गॅसचा मोठा आयातदार देश आहे.
भारातनं डोनाल्ड ट्रम्प प्रशासन देखील भारतासोबतचं उर्जा क्षेत्रातलं सहकार्य अजून वाढवण्यासाठी उत्सुक असल्याचं म्हटलं होतं. याबाबत चर्चा सुरू असल्याचं देखील परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.