
पुरापाषाण युगात माणूस गुहेत राहायचा. कृषी संस्कृतीमध्ये वस्तीत वास्तव्य सुरु झालं. आधुनिक काळात गुहांमध्ये राहणारी माणसं दुर्मिळच. मात्र आजही काहीजण साधे आणि शांततामय जीवन जगण्यासाठी गुहेत राहतात. अशाच शांततेच्या शोधात गुहेत राहणार्या दुर्मिळ व्यक्तीला ट्रॅव्हल व्लॉगर (Travel Vlogger) कोलिन यांनी प्रकाशझोत आणलं आहे. गुहेत राहणार्या वृद्धाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. कोलिन यांनी यमनमधील सोकोट्रा बेटाच्या खडकाळ किनाऱ्यावरील एका गुफेमध्ये राहणाऱ्या वृद्धाचा टिपलेला जीवनप्रवासाचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये पृथ्वीवरील गुहेत राहणार्या अखेरच्या माणसाची भेट झाल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये ट्रॅव्हल व्लॉगर कोलिन हे गुहेत राहणारे अलियाह यांच्याशी चर्चा करताना दिसतात. ते सांगतात की, "तो पृथ्वीवरील गुहेत राहणारा अखेरचा रहीवासी असू शकतो. ६२ वर्षीय अलियाह हे यमनच्या सोकोट्रा बेटावर राहतात. कंबरेला फक्त एक कापड आणि गळ्यात मोठे शंख-शिंपल्यांचे दागिने, अशा वषात ते जीवन व्य्तीत करा. गुहावासीच्या जीनवशैलीचे कोलिनला आपल्या झलक दाखवतो. अलियाह सांगतात की, त्याला १५ मुले होती, त्यापैकी ९ मुलांचे निधन झाले आहे. हीच निसर्गाची रीती आहे," असे म्हणत तो हसत जीवन स्वीकारतो.
कोलिनच्या म्हणण्यानुसार, “अलियाह एका गुफेत झोपतो, मासे हाताने पकडतो आणि खडबडीत खडकांवर अणवाणी पायांनी चालतो. त्याचे दिवस वेळेनुसार नाही, तर भरती-ओहोटीच्या चक्रानुसार मोजले जातात. ना फोन, ना वीज – केवळ वाऱ्याची आणि पाण्याची लय. आणि तरीही तो अशा पद्धतीने हसतो, जणू काही त्याला एक अशी गोष्ट माहित आहे , जी आपण सर्वांनी विसरलेली आहे. त्याच्या निवासस्थानाभोवती प्राण्यांची हाडं विखुरलेली आहेत आणि समुद्राच्या खारट वाऱ्याचा वास दरवळतो. तो अजूनही शिकारी आणि अन्नसंग्रहाच्या जुन्या पद्धती अवलंबतो. प्राणी शिकारी प्राण्यांना समुद्रात धुतो. तो "समुद्रातील जीवांबरोबर खेळायला आवडतं," असंही तो हसत सांगतो.
कोलिन यांचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. या व्हिडिओला आतापर्यंत १७ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले असून, त्यामध्ये लक्षणीय वाढही होत आहे. तसेच युजर्स वेगवेगळ्या प्रतिक्रियाही देत आहेत. अनेकांनी त्याच्या जीवनशैलीचे कौतुक करत "तो आपले सर्वोत्तम जीवन जगतो आहे" असे म्हटले आहे. एका युजरने म्हटलं आहे की, "हा सर्वात नम्र आणि विलक्षण असा माणूस कधी पाहिला आहे." तर दुसऱ्याने टिप्पणी केली, "तो बहुतांश कोट्यधीशांपेक्षा जास्त श्रीमंत आहे. फोन नाही, केवळ वर्तमान क्षणात जगणे!"