धक्‍कादायक ! आईस्‍क्रिममध्ये आढळला चक्‍क विषारी साप

Snake Found In Ice-cream | फेसबूकवर फोटो शेअर केल्‍याने घटना उघडकीस
Snake Found In Ice-cream
थायलंडमध्ये एका व्यक्‍तिला आईस्‍क्रिममध्ये आढळलेला साप (Image Source X )
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क

सध्या पॅकेटबंद खाद्यपदार्थांमध्ये अनेक चित्रविचित्र वस्‍तू सापडत आहेत. आता एका आईस्‍क्रिममध्ये चक्‍क एक छोटा साप आढळला आहेत. एका चॉकलेट बार आईस्‍क्रिममध्ये गोठलेल्‍या अवस्‍थेत हा साप हाेता. एका व्यक्‍तिने फेसबुक पोस्‍ट करत याचे फोटो शेअर केले आहेत. ‘फ्रि प्रेस जर्नल’ या वृत्तसंस्‍थेने हे वृत्त दिले आहे.

थायलंडमधील रॅचबुरी विभागात ही खळबळजनक घटना घडली आहे. रेबॅन नॅकलेंबुन असे या फेसबुक युजर्सचे नाव आहे. ‘हे तुझे डोळे किती क्‍यूट दिसतात. तु असा कसा मेलास? काळ्या बीन्ससारखा, पण हा फोटो खरा आहे कारण मी हे खरेदी केले आहे’ अशी पोस्‍ट रेबॅन ने फोटोसोबत लिहीली आहे.

या व्यक्‍तिने एका ‘ब्‍लॅक बीन्स आईस्‍क्रिम बार’ खरेदी केला होता. रॅपर उघडल्‍यावर त्‍याला धक्काच बसला आईस्‍क्रिम बारमध्ये ब्‍लॅक बिन्सबरोबर चक्‍क छोटा साप दिसला. त्‍याने या बारचे फोटो काढून तो फेसबूकवर शेअर केला व पोस्‍ट शेअर करत आपल्‍या भावना व्यक्‍त केल्‍या.

आईस्‍क्रिमचे रॅपर उघडल्‍यावर छोटा साप बारच्या टोकावर रुतून बसला होता त्‍याचे डोळे थोडेसे बाहेर आले होते. त्‍याने तो बार फेकून न देता त्‍याचे फोटो काढले व सोशल मिडीयावर मित्रांना टाकत हा अतिशय धक्‍कादायक अनुभव शेअर केला. हे फोटो सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल झाले आहेत.

आढळलेला साप हा विषारी

आईस्‍क्रिमध्ये आढळलेला साप हा विषारी होता. काळे - पिवळे पट्टे असलेला हा साप आईस्‍क्रिममध्ये दबला होता. ‘गोल्‍डन ट्री’ स्‍नेक या प्रजातीचा हा विषारी साप असल्‍याची शक्‍यता व्यक्‍त केली जात आहे. त्‍याच्या या फोटोवर अनेक कमेंट येत आहेत. तर अशाच प्रकारची घटना २०२४ मध्येही समारे आली होती. तर मुंबईतही एका ऑनलाईन मागवलेल्‍या केकमध्ये मानसाच्या हाताचे बोट आढळल्‍याने खळबळ उडाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news