Tortoise and Rabbit race | लहानपणापासून ऐकलेल्या ससा - कासवाच्या गोष्टीतील शर्यतीत कोण जिंकते? प्रत्यक्षातच पहा!
Tortoise and Rabbit race ईसापनीतीमधील 'ससा आणि कासव' ही कथा जगभरात प्रसिद्ध आहे. ही केवळ एक मनोरंजक गोष्ट नसून मानवी स्वभावावर भाष्य करणारा एक महत्त्वाचा धडा आहे. आपण लहानपनापासून ही गोष्ट ऐकत आलो आहे. एका जंगलात एक ससा राहायचा, ज्याला आपल्या वेगाचा खूप गर्व होता. तो नेहमी हळू चालणाऱ्या कासवाची टिंगल करायचा. एकदा कासवाने सशाला शर्यत लावण्याचे आव्हान दिले. ससा हसत हसत तयार झाला. या शर्यतीत सशाला वाटते आपण सहज जिंकू शकतो तो बेफिकीरपणे शर्यत लावतो.
शर्यत सुरू झाली. ससा वाऱ्याच्या वेगाने पुढे निघून गेला आणि कासव खूप मागे राहिले. अर्ध्या वाटेवर गेल्यावर सशाने मागे वळून पाहिले, तर कासव कोठेच दिसत नव्हते. सशाने विचार केला, "कासवाला इथपर्यंत यायला अजून खूप वेळ लागेल, तोपर्यंत मी या झाडाखाली थोडी विश्रांती घेतो." थंड हवेमुळे सशाला गाढ झोप लागली. दुसरीकडे, कासव मात्र हळूहळू पण न थांबता चालत राहिले. त्याने झोपलेल्या सशाला मागे टाकले आणि शर्यतीच्या शेवटच्या टोकापर्यंत पोहोचले. जेव्हा सशाला जाग आली, तेव्हा तो धावत सुटला, पण तोपर्यंत कासवाने शर्यत जिंकली होती.
शिकवण काय?
ही गोष्ट आपल्याला जीवनातील खूप मोठा धडा देऊन जाते. हळू पण सातत्यपूर्ण प्रयत्नांनी विजय मिळतो वेगापेक्षा तुमचे प्रयत्न किती सातत्यपूर्ण आहेत हे महत्त्वाचे असते. अतिआत्मविश्वास घातकी असतो आणि एकाग्रता या गोष्टी लक्षात ठेवल्या तर तुम्ही जीवनात यशस्वी होऊ शकता.
गोंधळलेला ससा आणि एकाग्र कासव
या कथेचा संदर्भ येथे देण्याचे काम म्हणजे या कथेची प्रचिती खरचं आहे का हे पडताळणी एका व्हिडीओत केली आहे. या X पोस्टमध्ये एका चिनी भाषिक प्रदेशातील एका कौटुंबिक कार्यक्रमात आयोजित केलेल्या ससा आणि कासवाच्या शर्यतीचा एक व्हिडिओ दाखवण्यात आला आहे. यामध्ये या दोघांची शर्यत लावली जाते ससा सुरवातीला वेग घेतो पण नंतर थांबतो. परत थोडावेळ धावतो पण पुन्हा गोंधळतो. पुढे जातो परत थांबतो
तिकडे कासव मात्र दिलेल्या मार्गावरुन एकसारखे चालत जाते. शेवटी सशाला हुसकावले जाते, पुढे जाण्यासाठी प्रवृत्त केले जाते पण ससा गोंधळलेलाच राहतो. शेवटी ससा मागे राहतो व कासव जिंकतेच. या व्हिडीओत कासवाने पुन्हा सिद्ध केले की संथपणे पण प्रयत्नपूर्वक कोणतेही काम केले की त्यात यश येतेच.
8,69,000 पेक्षा जास्त व्ह्यूज
या व्हिडिओला सुरवातीला २४ तासांच्या आत 8 लाखांहून अधिक ह्यूज मिळाले आहेत. तसेच नैसर्गिक वेग आणि अतिआत्मविश्वासापेक्षा सातत्यपूर्ण प्रयत्न नेहमीच यशस्वी ठरतात.' व्हिडिओवरील प्रतिक्रियांमध्येही एकाग्रता विरुद्ध विचलन या मुद्द्यावर चर्चा करून हाच धडा अधोरेखित करण्यात आला आहे. अशा हजारो प्रतिक्रीया या व्हिडीओवर आल्या आहेत.

