जगासमोर नव्या युद्धतंत्राचा धोका

पेजर, वॉकीटॉकीपाठोपाठ आता चॉकलेट बॉम्बची शक्यता
threat of a new war system is facing the world
नवीन युद्धतंत्राविषयी थोडक्यात माहिती.Pudhari File Photo
Published on
Updated on

मोसाद या इस्रायलच्या गुप्तचर यंत्रणेने लेबनॉनमधील हिजबुल्लाहाच्या दहशतवाद्यांना टार्गेट करण्यासाठी नवीन युद्धतंत्राचा अवलंब केला आहे. पेजर आणि वॉकीटॉकीच्या साहाय्याने लेबनॉनमध्ये घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 40 हून अधिक जणांचा मृत्यू झाला असून, 400 जखमी झाले आहेत. मोसादने पेजर कंपन्यांवर नियंत्रण प्रस्थापित करून पेजरमधील बॅटरीद्वारे बॉम्बस्फोट घडवून आणल्याचे बोलले जाते. या पार्श्वभूमीवर या नवीन युद्धतंत्राविषयी थोडक्यात माहिती...

रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर

पेजरमध्ये स्फोट घडवून आणण्यासाठी रेडिओ फ्रिक्वेन्सी आयडेंटीफिकेशनचा वापर केला जातो. वायरलेस कम्युनिकेशन्स प्रोटोकॉल्समध्ये बिघाड घडवून आणला जातो. पेजरच्या तंत्रज्ञानाची मदत घेऊन स्फोट घडवून आणले जातात. या तंत्राकडे अत्याधुनिक वॉरफेअर म्हणून पाहिले जाते.

पेजर तीन प्रकारचे

पेजर ही बिनतारी संदेशवहन यंत्रणा आहे. याद्वारे संदेश आणि सिग्नल प्राप्त केले जातात. पेजर तीन प्रकारचे असतात. मोबाईल हॅक केले जात असल्यामुळे लेबनॉनमधील दहशतवादी शक्यतो पेजरचा वापर करतात. पेजरमधील बॅटरीत स्फोटकाचा वापर करून रिमोट कंट्रोलद्वारे स्फोट घडवून आणले जातात. मोसादने पेजर बनविणार्‍या कंपन्यांना हाताशी धरून पेजरमध्ये स्फोटकाचा वापर केल्याचे सांगण्यात येते.

बॅटरीचे आयुष्य 85 दिवसांचे

पेजरमध्ये रिचार्जेबल लिथियम आयन बॅटरीचा वापर केला जातो. पेजरमधील बॅटरीचे आयुष्य 85 दिवसांचे आहे. तैवानमधील गोल्ड ओपोलो या कंपनीचे लेबनॉनमधील पेजरवर मार्किंग आढळून आले आहे. बुडापेस्ट येथील बीएससी कन्स्लटिंग या कंपनीने एआर-924 मॉडेलचे पेजर तयार केल्याचे पुढे आले आहे.

दहशतवादी पेजर का वापरतात?

स्मोर्टफोन हॅक होत असल्यामुळे हिजबुल्लाहाचे दहशतवादी आपसात संदेशवहन करण्यासाठी पेजरचा वापर करतात. पेजरवरील संदेशवहनावर कुणाची नजर नसते. संदेश पाठविणे आणि संदेश स्वीकारणे यासाठी पेजर तंत्रज्ञान सुरक्षित वाटत असल्याने त्याचा वापर करतात.

काऊंटर इंटेलिजन्स सिस्टीम

रशिया आणि इराणच्या मदतीने हिजबुल्लाहने काऊंटर इंटेलिजन्स सिस्टीम विकसित केली आहे. 1990 पासूनच हिजबुल्लाहने नव्या तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. अनइनक्रिप्टेट डेटा डाऊनलोड करण्याचे तंत्रही या दहशतवाद्यांनी आत्मसात केले आहे.

मोसादची इंटरसेप्ट क्षमता

मोसाद या इस्रायली गुप्तचर संस्थेकडून अत्याधुनिक दर्जाच्या युद्ध तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. कोणत्याही प्रकारचे कम्युनिकेशन सिग्नल इंटरसेप्ट करण्याची क्षमता मोसादकडे आहे. मोसादने इलेक्ट्रॉनिक सिग्नल इंटरसेप्शन आणि ह्युमन इंटेलिजन्सच्या साहाय्याने हिजबुल्लाहाच्या पेजरमध्ये स्फोटकांचा वापर केल्याची चर्चा आहे.

साखळी पुरवठा खंडित

हिजबुल्लाहाच्या दहशतवाद्यांकडून तीन कंपन्यांच्या पेजरचा वापर केला होता. त्यामुळे मोसादने या कंपन्यांच्या साखळी पुरवठ्यावर नियंत्रण प्रस्थापित केल्याची शक्यता आहे. लेबनॉनमध्ये पाठविल्या जाणार्‍या पेजरमध्येच स्फोटकांचा वापर करण्यात आल्याचेही बोलले जाते.

प्रक्रिया जटिल, गुंतागुंतीची

मोबाईलमधून आयडी स्फोट घडवून आणण्याचा प्रकार सर्वश्रुत आहे. भविष्यात पेजरच्या माध्यमातून स्फोट घडवून आणण्याचे तंत्र विकसित होण्याची शक्यता आहे. मोसादने जगात पहिल्यांदा वापर केला आहे. पेजरमध्ये स्फोटके भरण्याची प्रक्रिया जटिल आणि किचकट आहे.

चॉकलेट बॉम्बची चर्चा

लेबनॉनमध्ये पेजर, वॉकीटॉकी बॉम्बस्फोटानंतर घबराट पसरली आहे. पेजर आणि वॉकीटॉकीतील बॅटरी काढून फेकल्या जात आहेत. आता पुन्हा चॉकलेट बॉम्बची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

वॉकीटॉकीची निर्मिती जपानमध्ये

बॉम्बस्फोटात वापर करण्यात आलेल्या वॉकीटॉकीची निर्मिती जपानमध्ये झाल्याचे समोर आले आहे. जपानमधील कंपनीने मात्र 10 वर्षांपूर्वीच वॉकीटॉकीचे उत्पादन थांबविल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पेजरची निर्मिती तैवानमध्ये झाल्याचे स्पष्ट झाले आहे. तैवानच्या कंपनीनेही मात्र या स्फोटाशी आपला काही संबंध नसल्याचे सांगितले.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news