

इस्लामाबाद/नवी दिल्ली : पाकिस्तान सध्या प्रतिभेच्या सर्वात मोठ्या स्थलांतराचा सामना करत आहे. आर्थिक संकट आणि राजकीय अस्थिरतेच्या पार्श्वभूमीवर गेल्या दोन वर्षांत हजारो डॉक्टर, इंजिनिअर्स आणि अकाऊंटंटस्नी देश सोडला आहे.
नुकत्याच समोर आलेल्या सरकारी अहवालानुसार, गेल्या 24 महिन्यांत पाकिस्तानने 5,000 डॉक्टर, 11,000 इंजिनिअर्स आणि 13,000 अकाऊंटंटस् गमावले आहेत. या वास्तव परिस्थितीमुळे पाकिस्तानी जनता सरकार आणि लष्करप्रमुख असीम मुनीर यांच्यावर टीका करत आहे. मुनीर यांनी नुकतेच या सामूहिक स्थलांतराचे समर्थन करताना त्याला ‘ब्रेन गेन’ म्हटले होते; परंतु सरकारी आकडेवारी त्यांच्या या दाव्यातील फोलपणा उघड करत आहे. काय सांगतेय आकडेवारी? पाकिस्तानच्या ब्युरो ऑफ इमिग्रेशन अँड ओव्हरसीज एम्प्लॉयमेंटने प्रसिद्ध केलेली आकडेवारी चिंताजनक आहे.
असीम मुनीर यांची सोशल मीडियावर खिल्ली : ऑगस्ट महिन्यात अमेरिकेतील अनिवासी पाकिस्तानींना संबोधित करताना असीम मुनीर यांनी म्हटले होते की, परदेशात जाणारे लोक म्हणजे ब्रेन ड्रेन नसून तो पाकिस्तानसाठी ब्रेन गेन आहे. आता ही नवी आकडेवारी समोर आल्यावर नेटकर्यांनी त्यांना चांगलेच धारेवर धरले आहे.
नेटकर्यांकडून मुनीर धारेवर
एका वापरकर्त्याने मुनीर यांना मानसिक रुग्ण म्हणत टोमणा मारला, तर दुसर्याने म्हटले की, ‘या लोकांचे अज्ञान देशाला विनाशाकडे घेऊन जात आहे.‘पीटीआय समर्थकांचे मत : इम्रान खान यांच्या पक्षाच्या समर्थकांनी म्हटले की, ‘देशात उद्योग नाहीत, संशोधन निधी नाही आणि नोकर्याही नाहीत. विमानतळावर लोकांचा अपमान करून तुम्ही टॅलेंट थांबवू शकत नाही, त्यासाठी संधी निर्माण करावी लागते.’