पाकिस्तानातील हिंदूंची संख्या वाढली!

२०२३ च्या जनगणनेचे आकडे जाहीर : चाळीशीतील तरुणांचे प्रमाण ४० टक्के
Hindu Population
पाकिस्तानातील हिंदूंची संख्या वाढली!File Photo

इस्लामाबाद : वृत्तसंस्था, पाकिस्तानातील सर्वांत मोठा अल्पसंख्याक वर्ग असलेल्या हिंदूंची संख्या गेल्या सहा वर्षांत वाढली आहे. २०१७ मध्ये झालेल्या जनगणनेत त्यांची संख्या ३५ लाख होती, ती २०२३ मध्ये ३८ लाख झाली, असे सरकारी आकडेवारी सांगते. याबाबतचे वृत्त 'डॉन' या वृत्तपत्राने प्रसिद्ध केले आहे.

'पाकिस्तान ब्युरो ऑफ स्टॅटिस्टिक्स'ने ७वा लोकसंख्या आणि गृहनिर्माण अहवाल नुकताच प्रसिद्ध केला. त्यानुसार पाकिस्तानची लोकसंख्या २४ कोटी ४ लाख ५८ हजार ८९ एवढी झाली आहे. यात मुस्लिमांचे प्रमाण २०१७च्या तुलनेत किंचित कमी झाले आहे. २०१७ मध्ये मुस्लिमांचे एकूण लोकसंख्येत ९६.४७ टक्के प्रमाण होते, ते ९६.२५ झाले आहे.

इतर सर्व अल्पसंख्याक समुदायांची लोकसंख्या गेल्या सहा वर्षांत वाढली आहे. हिंदूंची लोकसंख्या वाढली, पण एकूण लोकसंख्येतील त्यांचे प्रमाण १.७३ वरून १.६१वर घसरले आहे. म्हणजेच इतर अल्पसंख्याक समुदायांची लोकसंख्या हिंदूंपेक्षा वेगाने वाढली आहे. गेल्या सहा वर्षांत पाकिस्तानची एकूण लोकसंख्या २०७.६८ दशलक्षांवरून २४१.४९ दशलक्ष एवढी वाढली. यात १२४.३२ दशलक्ष पुरुष, तर ११७.१५ दशलक्ष स्त्रिया आहेत. तृतीयपंथीयांची लोकसंख्या २० हजार ३३१ आहे.

वर्षांपेक्षा कमी वयाच्या लोकांचे प्रमाण ८० टक्के आहे. ६७पेक्षा जास्त वयाचे केवळ ३.५५ टक्के लोक या देशात आहेत. २०१७ मध्ये येथील ६६.२ टक्के लोक विवाहित होते. २०२३ मध्ये हे प्रमाण ६४.७९ टक्क्‌यांवर आले. याच काळात घटस्फोटितांचे प्रमाण ०.४२ टक्क्यावरून घटून ०.३५ टक्क्यावर आले आहे. विशेष म्हणजे, ग्रामीण भागात लोकसंख्यावाढीचे प्रमाण १.८८ टक्के आहे, तर शहरी भागात ते ३.६७ टक्के आहे, असे या जनगणनेतून स्पष्ट झाले.

अल्पसंख्याक वाढले

ख्रिश्चनांची लोकसंख्या २६ लाखांवरून ३३ लाखांवर गेली, तर त्यांचे प्रमाण १.२७ वरून १.३७ टक्के झाले. अहमदींच्या लोकसंख्येत २९ हजारांची घट झाली. त्यांची लोकसंखया एक लाख ९१ हजारांवरून एक लाख ६२ हजारांवर आली. शिख समुदायाची लोकसंख्या १५ हजार ९९८, तर पारशींची २, ३४८ एवढी आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news