Thailand School Gunshots Video: थायलंडच्या शाळेत गोळीबार; विद्यार्थी जीव वाचवण्यासाठी बाकाखाली बसले; 8 जणांचा मृत्यू

Thailand School Gunshots Video
Thailand School Gunshots Videopudhari
Published on
Updated on

Thailand School Gunshots Video: थायलंडच्या एका शाळेत आज (शुक्रवार दि. ७ ऑगस्ट) बेछुट गोळीबार झाला. या गोळीबारात ८ लोकांचा मृत्यू झाला. हल्लेखोराने आधी घरात आपल्या आजी-आजोबांना गोळी घातली. त्यानंतर त्याने शाळेत बेछुट गोळीबार केला. या विद्यार्थ्यांना जवळपास २६ राऊंड फायर केले. तसेच ३४ राऊंडचे अॅम्युनेशन घटनास्थळावरून ताब्यात घेण्यात आलं.

Thailand School Gunshots Video
J.J. Shootout Case : जे. जे. शूटआऊट प्रकरणी टाडा न्यायालयात अतिरिक्त पुराव्यांची नोंद

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून ज्यावेळी गोळीबाराचा आवाज ऐकू आला त्यावेळी विद्यार्थी आपला जीव वाचवण्यासाठी वर्गातील बाकांच्या खाली जाऊन बसले. ही गोळीबार देबसिरीन नॉनथाम्बुरी स्कूलमध्ये झाला. ही शाळा बँग कुरूई जिल्ह्यातील नॉनथाम्बुरी भागात आहे. हा प्रदेश बँकॉकच्या उत्तरपश्चिम भागात येतो.

स्थानिक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आठ लोकांचा मृत्यू झाला असून गोळीबार करणाऱ्याने स्वतःला देखील गोळी मारून घेतली. जखमींमध्ये एक शिक्षक आणि तीन विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

Thailand School Gunshots Video
Shootout in America : अमेरिकेत शाळेत गोळीबार, तीन मुलांसह 6 ठार; हल्ल्यानंतर राष्ट्राध्यक्ष बायडेन यांचे मोठे वक्तव्य म्हणाले,

१८ वर्षाच्या एका विद्यार्थ्याने सांगितंल की सुरूवातीला आम्हाला गनफायरचा आवाज आला त्यावेळी वाटलं की कोणतीरी फटाके उडवत आहे किंवा कोणीतरी एखाद्या वस्तू आपटत आहे.

तो पुढे म्हणाला, 'मला पहिल्यांदा वाटलं की तो काही गोळीबाराचा आवाज नाही. त्यानंतर अनेक शॉट्सचा आवाज आला अन् अचानक बंद झाला. तो आवाज पुन्हा सुरू झाला.

Thailand School Gunshots Video
America shootout : अमेरिकेतील गोळीबारात २ ठार, ५ जण जखमी

जिल्हा प्रशासनानुसार या शाळेत जवळपास ३ हजार १०० विद्यार्थी आहेत. तर १४७ शिक्षक देखील आहेत. या घटनेपूर्वी काही दिवसांपूर्वी हात येई जिल्ह्यातील एका शाळेत देखील गोळीबार झाला होता. त्यात शिक्षकाचा मृत्यू झाला तर एक विद्यार्थी जखमी झाला होता. ही घटना फेब्रुवारी महिन्यात झाली होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news