दहशतवाद्‍यांच्‍या यादीतून माझे नाव हटवा : हाफिज सईद

इस्‍लामाबाद : वृत्तसंस्‍था 

दशहतवाद्‍यांच्‍या यादीतून आपले नाव हटवण्‍यात यावे, अशी मागणी मोस्‍ट वाँटेड हाफीज सईदने संयुक्‍त राष्‍ट्र संघाकडे केली आहे. 'जमात-उद-दावा'चा म्होरक्या हाफीजने ही मागणी याचिकेद्‍वारे केली आहे. 

हाफीजची पाकने २९७ दिवसांच्या नजरकैदेतून नुकतीच सुटका केली आहे.  सुटकेनंतर हाफीजने आता काश्मीरच्या स्वातंत्र्यासाठी लढा देऊ, असे फुत्कार काढले होते. 'आता मी काश्मीरी जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी लढणार आहे. काश्मीरच्या स्वतंत्र्यासाठी पाकमधील नागरिकांना एकत्रित करणे हेच काम मी यापुढे करणार असल्‍याचे त्‍याने म्‍हटले होते.  

त्‍याच्‍या सुटकेनंतर अमेरिकेने हाफीजला पुन्‍हा नजरकैदेत ठेवण्‍याची आणि अटक करुन शिक्षा देण्‍याची मागणी केली होती. 

मुंबईवरील २६/११ च्‍या हल्‍ल्‍यानंतर हाफीज सईदला २००८ मध्‍ये यूएस सिक्‍युरिटी कौन्‍सिल रेजॉल्‍यूशनने दहशतवादी म्‍हणून घोषित केले होते. मे २००८ मध्‍ये म्‍हणजेच २६/११ च्‍या हल्‍ल्‍यापुर्वीच अमेरिकेने हाफीज सईदला दहशतवादी म्‍हणून घोषित केले होते. 
 

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news