Taliban New Criminal Code: पत्नी न सांगता नातेवाईकांकडे गेल्यावर तीन महिन्याचा तुरूंगवास.... तालीबानचा नवीन क्रिमिनल कोड

Taliban New Criminal Code
Taliban New Criminal Codepudhari photo
Published on
Updated on

Taliban New Criminal Code: अफगाणिस्तानातील तालीबान सरकार हे अनेक कारणांनी चर्चेत असतं. आता ते त्यांना नव्या क्रिमिनिल कोडमुळं जगभारत चर्चेत आलं आहे. अफगाणिस्तानातील तालीबान सरकारची महिलांच्या बाबतीत काय भूमिका आहे हे जगाला माहिती आहे. महिलांवर सर्वाधिक बंधने कुठे असतील तर ती तालिबान शासित अफगाणिस्तानात आहेत.

दरम्यान, तालीबान सरकारनं नवीन क्रिमिनल कोड सादर केला आहे. त्यात महिला आणि मुलांना देखील शारीरिक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. तालिबानचे सर्वोच्च नेते हिबतुल्ला अखुनजादा यांनी या क्रिमिनल कोडवर स्वाक्षरी देखील केली आहे. नवीन क्रिमिनिल कोडनुसार आता पती किंवा वडिलांना महिला आणि मुलांना सांगितलेल्या विशिष्ट मर्यादेत शारीरिक शिक्षा करण्याची परवानगी असणार आहे.

त्याचबरोबर तालिबानने अजून एक अजब कायदा केला आहे. त्यांनी ज्या महिला आपल्या पतीच्या परवानगीशिवाय नातेवाईकांकडे जातील त्यांना देखील तीन महिन्यापर्यंत तुरूंगवासाची शिक्षा देण्यात येणार आहे. या नव्या कायद्यांना गुलामगिरी म्हणून संबोधलं जात आहे. या नव्या क्रिमिनल कोडमुळं मनवाधिकारांचे उल्लंघन होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news