'नेस्ले' इफेक्‍ट..! स्वित्झर्लंडने भारताचा 'मोस्ट फेव्हर्ड नेशन' दर्जा संपवला!

भारतीय कंपन्‍यांना धक्‍का, आता अधिक कर भरावा लागणार
Switzerland
स्वित्झर्लंड सरकारने भारताला दिलेला मोस्ट फेव्हर्ड नेशन (MFN) दर्जा काढून घेतला आहे. (Image source- X)
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : स्वित्झर्लंड सरकारने भारतीय कंपन्‍यांना मोठा धक्‍का दिला आहे. स्वित्झर्लंडने भारताला दिलेला मोस्ट फेव्हर्ड नेशन (MFN) दर्जा काढून घेतला आहे. गेल्या वर्षी नेस्ले कंपनीशी संबंधित एका प्रकरणात आयकर कायद्यांतर्गत अधिसूचित केल्याशिवाय DTAA लागू करता येणार नाही, असे भारताच्‍या सर्वोच्‍च न्‍यायालयाने स्‍पष्‍ट केले हाते. भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे हे पाऊल उचलावे लागल्याचे निवेदन शुक्रवारीच स्वित्झर्लंडमधून आले होते. या निर्णयानंतर आता तेथे काम करणाऱ्या भारतीय कंपन्यांना १ जानेवारी २०२५ पासून जास्त कर भरावा लागणार आहे.

स्वित्झर्लंड सरकाराने आपल्‍या निवेदनात म्‍हटलं आहे की, स्वित्झर्लंड आणि भारत यांच्यातील उत्पन्नावरील करांच्या संदर्भात दुहेरी कर टाळण्याच्या करारानुसार मोस्‍ट फेव्‍हर्ड नेशचा MFN च्या अर्जाला स्थगिती देण्याची घोषणा स्विस वित्त विभागाने केली आहे. स्वित्झर्लंडने MFN स्थिती मागे घेण्याच्या निर्णयासाठी नेस्लेशी संबंधित एका प्रकरणात भारतीय सर्वोच्च न्यायालयाने 2023 च्या निकालाचा हवाला दिला.

सर्वोच्च न्यायालयाने केला होता उच्‍च न्‍यायालयाचा निर्णय रद्द

2021 मध्ये नेस्ले प्रकरणात दिल्ली उच्च न्यायालयाने दुहेरी कर टाळण्याच्या करारातील MFN कलम लक्षात घेऊन कर कायम ठेवला होता. तथापि, भारताच्या सर्वोच्च न्यायालयाने, 19 ऑक्टोबर 2023 रोजी दिलेल्या निकालात, कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय रद्द केला.

MFN म्हणजे काय?

जागतिक व्यापार संघटना (WTO) ही संयुक्‍त राष्‍ट्रांची (UNO) संघटना आहे. १६४ देश त्याचे सदस्य आहेत. त्या अंतर्गत असलेले सर्व देश एकमेकांना मोस्ट फेव्हर्ड नेशन (MFN) दर्जा देतात. हा दर्जा दिल्यानंतर संबंधित देश एकमेकांसोबत कोणताही भेदभाव न करता सहज व्‍यापार करतात.

MFN दर्जा कसा काढून घेतला जातो?

सर्वसाधारणपणे, WTO च्या कलम 21B अंतर्गत, कोणताही देश सुरक्षेशी संबंधित विवादांमुळे हा दर्जा दुसऱ्या देशाकडून काढून घेऊ शकतो. हा दर्जा मागे घेण्यासाठी अनेक मुख्य अटी पूर्ण कराव्या लागतील; परंतु प्रत्यक्षात ते काढण्यासाठी कोणतीही औपचारिक प्रक्रिया नाही.एखादे देश दुसऱ्या देशाकडून MFN दर्जा काढून घेत असल्यास WTO ला कळवणे बंधनकारक आहे की नाही हे देखील स्पष्ट नाही.

भारताने 2019 मध्ये पाकिस्तानकडून MFN दर्जा काढून घेतला होता. 2019 मध्ये जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानकडून MFN दर्जाही काढून घेतला होता. ज्या अंतर्गत पाकिस्तानमधून आयात होणाऱ्या अनेक वस्तूंवर सीमाशुल्क वाढवण्यात आले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news