Survival of the Fittest | Charles Darwin चा ‘सर्व्हायवल ऑफ द फिटेस्‍ट’ सिद्धांत आजच्या काळाशी किती सुसंगत!

शारिरीक क्षमतेपेक्षा बौद्धीक क्षमता ठरली आहे सरस
Survival of the Fittest
Charles Darwin
Published on
Updated on
Summary

चार्ल्स डार्वीनचा आज वाढदिवस 12 फेब्रूवारी त्‍यानिमित्त त्‍याच्या तत्‍वांचा घेतलेला आढावा

जो फिट तोच जगू शकतो हा सिद्धांत आजच्या काळात कितपत योग्य

आधुनिक वैद्यक शास्त्राने डार्विनच्या सिद्धांताना दिले आहे का आव्हान

Charles Darwin चार्ल्स डार्वीन यांनी उत्‍क्रांतीचा सिद्धांत मांडून जगाला हादरे दिलेल. जुन्या संपर्ण संकल्‍पनांना छेद देण्याचे काम केले आजही त्‍यांच्या उत्‍क्रातीच्या सिद्धांतावर आजच्या बायॉलॉजिकल संकल्‍पना, शरिरशास्‍त्र चालते याच डार्वीन यांनी आणखी एक गोष्‍ट सिद्ध केली. ती म्‍हणजे या पृथ्‍वीवर जो बलाढ्य असतो तोच टिकतो, सर्वायव्हल ऑफ फिटे्टस्‍ट, यामध्ये म्‍हटले आहे फिटेस्ट म्हणजे तो सजीव, जो आपल्या भोवतालच्या पर्यावरणाशी सर्वात जास्त सुसंगत आहे. तोच या पर्यावरणात तग धरून राहू शकतो.

जगण्यासाठी संघर्ष

दुसरी गोष्‍ट लक्षात घ्‍यावी लागेल ती म्‍हणजे निसर्गात संसाधने (अन्न, पाणी, जागा) मर्यादित असतात, पण सजीवांची संख्या मात्र वेगाने वाढते. यामुळे एकाच प्रजातीच्या किंवा वेगवेगळ्या प्रजातींच्या सजीवांमध्ये जगण्यासाठी सतत संघर्ष होतो. म्‍हणजे एखादा प्राणी अन्नसाठी हिंसक होऊ शकतो कारण त्‍याला उपजत ज्ञान असते की जगण्यासाठी अन्न महत्‍वाचे आहे पण ते मर्यादित आहे यामध्ये वाटेकरी नको त्‍यामुळे वाघासारखे प्राणी आपल्‍या इलाख्यासाठी भांडत असतात.

बुद्धिमत्ता हाच नवा 'फिटनेस'
मानव हा एक सामाजिक प्राणी आहे. डार्विनचा नियम वैयक्तिक पातळीवर लागू होतो, पण मानवाच्या बाबतीत 'सामूहिक जगणे' महत्त्वाचे ठरले आहे. समाज ही संस्कृतीची देण आहे समानता हे तत्‍व माणसाने अंगिकारले आहे. त्‍यामुळे शारिरीक कमकूवत लोकांना समाज बरोबर घेऊन जातो. शारिरीक क्षमतेपेक्षा बौद्धिक क्षमतेला आज प्रचंड महत्‍व आले आहे.

सजीवांमधील विविधता

एकाच प्रजातीचे सर्व सजीव सारखे नसतात. त्यांच्यामध्ये थोडेफार फरक असतात. काही बदल सजीवाला जगण्यासाठी मदत करतात, तर काही घातक ठरू शकतात. उदाहरणारत ससा हा वाळवंटी भागातही आढळतो व बर्फाळ प्रदेशातही आढळतो हे एकाच प्रजातीचे असतात पण वाळवंटी सशाच्या अंगावर कमी लव आढळणार तर बर्फात राहणारा ससा हा अतिशय केसाळ व वेगळी शारिरीक वैशिष्‍ट्ये असणाारा असतो. तसेच जंगलातील बिबट्या व हिमबिबट्या हे एकाच जातकुळीतील असले तरी दोन्ही ठिकाणच्या विपरीत भौगोलिक परिस्‍थितीनुसार त्‍यांच्यात बदल झालेला असतो.

वारसा चालवणे

डार्विनच्या मते असे फिटेस्‍ट असणारे प्राणीच सक्षमपणे जगतात व तेच पुढे जाऊन प्रजनन करू शकतात. त्यांचे ते फायदेशीर गुणधर्म त्यांच्या पुढच्या पिढीमध्ये उतरतात. हजारो वर्षांच्या या प्रक्रियेतून एखादी नवीन प्रजाती निर्माण होते. पण त्‍यातही वेगवेगळ्या भौगोलिक परिस्‍थितीनुसार बदल होत जातो.

आजच्या आधुनिक वैद्यकशास्‍त्रानुसार मानवासाठी हा नियम कितपत योग्‍य ?

आज मानवाने वैद्यकशास्त्रात एवढी प्रगती केली आहे की आपण केवळ शरीराने बलवान आहोत म्हणून जगत नाही, तर आपण वैद्यकीयदृष्ट्या किती प्रगत आहोत, यावरही आपले अस्तित्व अवलंबून आहे.

मानव आता वैद्यकशास्त्रामुळे जनुकांपेक्षा तंत्रज्ञामुळे अधिक जगू शकतो

डार्विनने ज्या काळात हा सिद्धांत मांडला त्‍या काळात, ज्यांच्या शरीरात नैसर्गिकरीत्या रोगांशी लढण्याची किंवा पर्यावरणाशी जुळवून घेण्याची क्षमता नसायची, ते सजीव जगू शकत नव्हते. पण आज वैद्यकशास्त्रामुळे मानवाची जगण्याची क्षमता ही त्याच्या जनुकांपेक्षा त्याच्याकडे असलेल्या तंत्रज्ञानावर जास्त अवलंबून आहे.

उदा. एखाद्या दुर्मिळ आजार असलेला मानव आधुनिक औषधोपचाराने खूप वर्षे चांगले जीवन जगू शकतो. किंवा कृत्रीम अवयवर रोपणाने जीवघेणे अनेक आजार बरे होऊ शकतात. अपंग व्यक्तिला चांगल्याप्रकारे सदृढ माणसासारखे राहता येते.

'फिट्टेस्ट'ची व्याख्या बदलली आहे

डार्विनच्या मते 'फिट' म्हणजे तो जो जास्तीत जास्त संतती निर्माण करून आपली जनुके पुढच्या पिढीकडे सोपवतो. पूर्वी एखादा अनुवंशिक दोष असल्यास ती व्यक्ती प्रजननापूर्वीच दगावण्याची शक्यता असे. आज अनेक संशोधनामुळे औषधोपचार आणि शस्त्रक्रियेमुळे अशा व्यक्ती आपले आयुष्य पूर्ण जगतात आणि आपली जनुके पुढच्या पिढीकडे सोपवू शकतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news