Pakistan Suicide Blast | पाकिस्तानात रॅलीत आत्मघाती स्फोट; ८ पोलिसांसह १४ ठार, २२ गंभीर जखमी

युवकाने स्‍फोट करून स्‍वत:ला उडवले
 स्फोटानंतर घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस.
स्फोटानंतर घटनास्थळाची पाहणी करताना पोलीस.
Published on
Updated on

इस्लामाबाद; वृत्तसंस्था : पाकिस्तानच्या खैबर पख्तूनख्वा प्रांतातील स्वात जिल्ह्यात रविवारी एका पोलिस ठाण्याबाहेर आत्मघाती हल्ला झाला. यात ८ पोलिसांसह १४ जणांंचा मृत्यू झाला, तर २२ जण गंभीर जखमी झाले आहेत. पाकिस्तानी मीडिया डॉननुसार, हल्ल्याच्या वेळी जवळच्या काबल चौकात दहशतवादाविरोधात शांतता रॅली सुरू होती. स्वातचे जिल्हा पोलिस अधिकारी उमर खान यांनी सांगितले की, याच दरम्यान एक युवक काबल पोलिस ठाण्याच्या गेटवर पोहोचला. पोलिसांनी त्याला थांबवून झडती घेण्याचा प्रयत्न केला. पण तो थांबला नाही. पोलिसांनी कारवाई करण्यापूर्वीच युवकाने स्वतःला स्फोट करून उडवले. सध्या कोणत्याही संघटनेने हल्ल्याची जबाबदारी स्वीकारलेली नाही. पोलिस हाय अलर्टवर आहेत. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसर सील करून शोधमोहीम सुरू केली आहे.

लोक दहशतवादाविरोधात रॅली काढत होते

स्फोटापूर्वी रविवारी अनेक लोक दहशतवादाविरोधात शांतता रॅली काढत होते. यावेळी आंदोलकांनी स्वातमध्ये वाढणाऱ्या दहशतवादी घटनांचा निषेध केला. डॉननुसार, आंदोलकांनी सांगितले की त्यांच्या आंदोलनाचा एकच उद्देश आहे, परिसरात शांतता परत आणणे आणि दहशतवादाचा खात्मा करणे. ते म्हणाले की, ही सरकारची जबाबदारी आहे. असुरक्षिततेचे वातावरण असेच राहिले तर लोकांमध्ये मोठा जनआक्रोश निर्माण होऊ शकतो. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली झरदारी यांनी स्फोटात लोकांच्या मृत्यूवर दुःख व्यक्त केले. राष्ट्रपती कार्यालयाच्या माहितीनुसार, त्यांनी संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले.

१५४ दहशतवादी हल्ल्यात जुलैमध्‍ये मृत्यू

पाकिस्तान इन्स्टिट्यूट फॉर कॉन्फ्लिक्ट अँड सिक्युरिटी स्टडीजच्या मासिक सुरक्षा अहवालानुसार, खैबर पख्तूनख्वामध्ये दहशतवादी कारवायांमध्ये वाढ झाली आहे. जुलैमध्ये अनेक जिल्ह्यांमध्ये दहशतवादाशी संबंधित १५४ मृत्यू नोंदवले गेले, तर जूनमध्ये ही संख्या ७५ होती.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news