पुन्हा बेभान वारा! लॉस एंजेलिसमधील आग विझता विझेना

वेगवान वार्‍यामुळे आग आणखी पसरण्‍याची भीती
Los Angeles Wildfire
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.Image source- X
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्‍क : अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील लॉस एंजेलिसमध्ये लागलेल्या आगीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. निसर्गाच्‍या प्रकोपात आतापर्यंत २४ जण मृत्‍युमुखी पडल्‍याचे स्‍पष्‍ट झाले आहे. एकीकडे अग्निशमन दल आग विझवण्याचे प्रयत्‍न युद्धपातळीवर करत असतानाच आज (दि.१४) पुन्हा जोरदार वारे वाहत आहे. त्‍यामुळे परिसरात आग पसरण्‍याचा धोका निर्माण झाला आहे.

लॉस एंजेलिसमधील आग वाढण्याचा धोका

आग विझवण्याचे प्रयत्‍न युद्धपातळीवर करत असतानाच आज (दि.१४) पुन्हा जोरदार वारे वाहतआहे. त्‍यामुळे परिसरात आग वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे.

२४ जणांचा मृत्‍यू, १६ बेपत्ता

कॉलिफोर्निया जंगलात मंगळवार ७ जानेवारी रोजी आग लागली. ती लॉस एंजेलिस शहरात पसरली. नैसर्गिक प्रकोपात आतापर्यंत एकूण २४ जणांचा मृत्यू झाला आहे. त्याच वेळी, १६ हून अधिक लोक बेपत्ता असल्याचे सांगितले जात आहे. १,००,००० हून अधिक लोकांना त्यांचे घर सोडून इतर भागात स्थलांतर करण्यास भाग पाडण्यात आले आहे. याशिवाय, इतर अनेक भागात लोकांना विजेशिवाय जगावे लागत आहे.या नैसर्गिक आपत्तीमध्‍ये किमान १५० अब्ज डॉलर्स (सुमारे १३ लाख कोटी रुपये) चे नुकसान झाल्‍याचा अंदाज व्‍यक्‍त केला जात आहे. सर्वात जास्त नुकसान सांता मोनिका आणि मालिबू दरम्यानच्या पॅसिफिक पॅलिसेड्स भागात झाले आहे. रविवारी सकाळपर्यंत येथे २३,६५४ एकर जमीन जळून खाक झाली होती. यामध्ये ५३०० हून अधिक इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.

अनेक सेलिब्रिटींची घरे जळून खाक

लॉस एंजेलिसमधील भीषण अग्‍नि तांडवात अनेक मोठ्या सेलिब्रिटींची घरे जळून खाक झाली आहेत. यामध्ये हॉलिवूड अभिनेते मेल गिब्सन, लेइटन मेस्टर आणि अॅडम ब्रॉडी यांचा समावेश आहे. शहरात आग लागली तेव्हा हे सर्व कलाकार गोल्डन ग्लोब पुरस्कार सोहळ्यात उपस्थित होते. मॉडेल आणि अभिनेत्री पॅरिस हिल्टनचेही घरही आगीत भस्‍मसात झाले आहे. लॉस एंजेलिस काउंटीचा ४०,००० एकर परिसर जळून खाक झाला आहे. १२,००० हून अधिक इमारती जळून खाक झाल्या आहेत. दरम्‍यान, अग्निशमन दलाच्या पथकाने पॅलिसेड्समधील सुमारे १३ टक्के भागात आग आटोक्यात आणला आहे. आग सध्या पूर्वेकडे सरकत आहे, ज्यामुळे ब्रेंटवुड परिसराला सर्वात मोठा धोका निर्माण झाला आहे.

आग इतक्या वेगाने का पसरत आहे?

लॉस एंजेलिस काउंटी शेरीफ रॉबर्ट लुना यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, आगींची संभाव्य कारणे शोधले जात आहे. तथापि, गेल्या वर्षी कॅलिफोर्नियातील दुष्काळामुळे परिस्थिती खूपच बिकट झाली. खरं तर, दुष्काळात, येथे अशी अनेक झाडे, वनस्पती आणि वनस्पती वाढल्या आहेत जी सुकली आहेत. यामुळे आग परिसरात वेगाने पसरली. ऑक्टोबर २०२४पासून लॉस एंजेलिसच्या मध्यभागी फक्त ४० मिमी पाऊस पडला आहे. कोरड्या दुष्काळामुळे आजूबाजूच्या जमिनीत ओलावा शिल्लक राहिला नाही. आग वेगाने पसरण्यामागे हे देखील एक प्रमुख कारण आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news