पुढारी ऑनलाईन डेस्क : तिबेटमध्ये मंगळवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या शक्तिशाली भूकंपातील मृतांची संख्या किमान 53 वर पोहोचली आहे, असे वृत्त चीनमधील सरकारी वृत्तसंस्थेच्या हवाल्याने 'एपीएफ'ने दिली आहे. (Earthquake in Tibet) चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर (CENC) नुसार, मंगळवारी सकाळी ९.०५ वाजता (बीजिंग वेळेनुसार) जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ इतकी होती. ६२ हून अधिक जखमी झाले असून गंभीर जखमींची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
तिबेटमध्ये मंगळवारी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. या भीषण भूकंपात ५३ हून अधिक लोकांचा मृत्यू झाला. चायना अर्थक्वेक नेटवर्क सेंटर (CENC) नुसार, आज सकाळी ९.०५ वाजता (बीजिंग वेळेनुसार) जाणवलेल्या या भूकंपाची तीव्रता रिश्टर स्केलवर ६.८ इतकी होती. चीनच्या सरकारी माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, तिबेटमध्ये 6.8 तीव्रतेच्या भूकंपात मृतांचा आकडा ५३ झाला आहे. ६२ हून अधिक जखमी झाले असून, गंभीर जखमींची संख्या पाहता मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.
चीनमधील माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपाच्या केंद्राजवळ अनेक इमारतीही कोसळल्या. "डिंगरी काउंटी आणि त्याच्या आजूबाजूच्या भागात खूप जोरदार हादरे जाणवले. भूकंपाच्या केंद्राजवळील अनेक इमारती कोसळल्या आहेत. दरम्यान, दिल्ली-एनसीआर आणि बिहारची राजधानी पाटणासह उत्तर भारताच्या विविध भागांमध्ये आणि राज्याच्या उत्तर भागात अनेक ठिकाणी भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. आसामसह पश्चिम बंगाल आणि ईशान्येकडील राज्यांमध्येही भूकंपाचे धक्के जाणवले.
नॅशनल सेंटर फॉर सिस्मॉलॉजीने दिलेल्या माहितीनुसार, नेपाळ-तिबेट सीमेजवळ असलेल्या झिझांग येथे सकाळी ६:३५ वाजता पहिला ७.१ रिश्टर स्केलचा भूकंप झाला. तिबेटमधील दुसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर असलेल्या शिगात्से शहरात चिनी अधिकाऱ्यांनी 6.8 तीव्रता नोंदवली. त्याच झिझांग परिसरातून ४.७ आणि ४.९ तीव्रतेचे दोन धक्के जाणवले.