Stephen Hawking Dies : अफाट इच्छाशक्तीचे दुसरे नाव स्टीफन हॉकिंग!
केंब्रिज : पुढारी ऑनलाईन
जीवशास्त्राचे संशोधक डॉ. फ्रँक हॉकिंग आणि ऑक्सपर्डच्या पदवीधर असणाऱ्या इझाबेल या दाम्पत्याच्या घरी ८ जानेवारी १९४२ स्टीफन हॉकिंग यांचा जन्म झाला. त्यांना फिलिपा आणि मेरी या दोन बहिणी आणि एडवर्ड नावाचा दत्तक भाऊ अशी भावंडे होती. या सर्व भावंडात स्टीफन हॉकिंग हुशार होते. अफाट वाचनाची आवड लहानपनापासून जोपासलेल्या स्टीफन यांना गणित आणि भौतिक शास्त्रात रस होता. गणिताच्या शिक्षकाच्या प्रभावित होऊन त्यांनी भौतिक शास्रात जगाला न सुटलेली गणिते सोडवून एक विशेष ओळख निर्माण केली.
१९६२ मध्ये स्टीफन यांना अचानक त्रास होऊ लागला. अनेक डॉक्टरांकडे उपचार केल्यानंतरही निदान लागेना. वयाच्या २१ व्या वर्षी त्यांना मोटर न्यूरॉन डिसीज हा असाध्य रोग झाल्याचे निदान झाले. या रोगामुळे शरीरातील स्नायूंवरचे नियंत्रण संपून अशक्तपणा, अडखळत बोलणे, अन्न गिळतांना त्रास होणे, हळूहळू चालणे-फिरणे आणि बोलणे बंद झाले. या आजारातून स्टीफन हॉकिंग जेमतेम दोन वर्षे जगतील असे त्यांना सांगण्यात आले होते. मात्र प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर त्यांनी तब्बल ५४ वर्षे मुत्युशी संघर्ष केला.
वाचा : जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग यांचे निधन
व्हील चेअरच्या आधारावर मृत्यूची झुंज देणाऱ्या स्टीफन यांना १९८५ न्यूमोनिया रोगाची लागण झाली. याआजारानंतर त्यांच्या श्वास नलिकेला छिद्र करून शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे त्यांचा आवाज कायमचा गेला. त्यानंतर ते संगणतज्ज्ञ डेव्हिड मेसन यांनी तयार केलेल्या आज्ञावलीच्या माध्यमातून ते आपल्या भावना व्यक्त करणे स्टेफीन यांना शक्य झाले.
