

सॅन फ्रॅन्सिस्को : अमेरिकेतील भारतीय उद्योजक आणि ग्रेपटाईल या स्टार्टअपचे सीईओ व सह-संस्थापक दक्ष गुप्ता यांनी फ्रेशर्ससाठी 1.5 कोटी रुपयांपर्यंतचे वार्षिक वेतन दिले जाणार असल्याची घोषणा केली आहे. मात्र या आकर्षक पॅकेजसोबतच ‘9-9-6’ (म्हणजे सकाळी 9 ते रात्री 9, सहा दिवस काम) असा कडक नियम बंधनकारक आहे.
दक्ष गुप्ता यांनी 14 तासांच्या कामकाजाच्या समर्थनावरून मोठी टीका झेलली होती. सिलिकॉन व्हॅलीमधील अनेक व्यावसायिक आठवड्यात 6 दिवस, रोज 12 तासांहून जास्त काम करतात, असे त्यांचे म्हणणे आहे.
दक्ष गुप्ता म्हणतात, सध्याचा ट्रेंड म्हणजे, दारू-ड्रग्स नाही, 9-9-6 वेळापत्रक, वजन उचलणे, लांब पळणे, लवकर लग्न करणे, झोप ट्रॅक करणे, आणि सुकं मांस- सगळं खाणे.
प्रवेश स्तरावर वार्षिक मूळ वेतन 1,40,000 ते 1,80,000 (सुमारे 1.2 -1.5 कोटी) दिले जाईल, तसेच 1,30,000 - 1,80,000 इतके शेअरचे मूल्य लाभार्थ्याला मिळेल. अनुभवी व्यावसायिकांसाठी पगार 2,40,000 ते 2,70,000 इतका आहे.