‘तिने’ १९१८ मध्ये स्पॅनिश फ्ल्यूला आणि २०२० मध्ये कोरोनाला हरवले

Published on
Updated on

माद्रिद : पुढारी ऑनलाईन 

स्पेनच्या अलकला डेल व्हाले शहरात राहणाऱ्या अॅना डेल व्हाले या वयोवृद्ध महिलेने चमत्कार केला आहे. तिने कोरोनाच्या या संकटकाळात लढण्यासाठी अनेकांना स्फुर्ती दिली आहे. ती ज्यावेळी लहान मुलगी होती त्यावेळी तिने 1918 च्या महाभयंकर अशा स्पॅनिश फ्ल्यू साथीशी दोन हात करत त्याला पराभूत केले होते. त्यानंतर आता वयाची शंभरी पार केल्यानंतर अॅनाने कोरोनाला अस्मान दाखवत सर्वांसमोर एक आदर्श ठेवला आहे. 

स्पेनमधील द ऑलिव्ह प्रेस या इंग्रजी दैनिकाने दिलेल्या वृत्तानुसार स्पॅनिश फ्ल्यूने 1918 मध्ये जगभरात थैमान घातले होते. त्यावेळी अॅना छोटी मुलगी होती. तिलाही त्यावेळी स्पॅनिश फ्ल्यूची लागण झाली होती पण, त्याविरुद्ध लढत देत ती बरी झाली होती. या स्पॅनिश फ्ल्यूने जगभरात जवळपास 36 महिने धुमाकूळ घातला होता. ( जानेवारी 1918 ते डिसेंबर 1920 ) या स्पॅनिश फ्ल्यूने जगभरातील जवळपास 5 कोटी लोकांना आपल्या मगरमिठीत घेतले होते. 

आता 102 वर्षांनी अशाच प्राकारे कोरोना विषाणूने जगभरात थैमान घातले आहे. यावेळीही अॅना या सथीच्या रोगाच्या कचाट्यात सापडली. पण, याहीवेळी अॅनाने या साथीच्या रोगाला चितपट केले. तसे पाहिले तर कोरोनाचा सर्वात जास्त धोका हा वयोवृद्ध लोकांना आहे. त्यामुळे या आजारामुळे मृत्यूमुखी पडणाऱ्यांमध्ये वयोवृद्ध लोकांचा आकडा मोठा आहे. त्यात अॅना ह्या येत्या सहा महिन्यात 107 वर्षांच्या होतील. त्यांनी कोरोनावर मात करणे म्हणजे एक चमत्कारच म्हणावा लागेल. 1913 मध्ये जन्मलेल्या अॅनांनी 107 वय पार केले तर ती स्पेन आणि जगभरात कोरोनाला हरवणारी सर्वात वयोवृद्धांपैकी एक ठरणार आहे. यापूर्वी डच असलेल्या कोरनेलिया रास यांनी वयाच्या 107 व्या वर्षी कोरोनाला हरवण्याची करामत केली आहे. 

एका स्थानिक माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत अॅनाची सून पेक्वी सांजेझ यांनी त्यांचे कुटुंबीय रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांचे आभारी असल्याचे सांगितले. याचबरोबर त्यांनी डॉक्टरांनी त्यांच्या सासूबाईंची त्यांचे वय पाहता अधिक काळजी घ्यालया सांगितली आहे. पेक्वी म्हणाल्या 'त्यांच्या डॉक्टरांनी अॅनांचे सर्व रिपोर्ट उत्तम आहेत, पण आपल्याला अधिक काळजी घ्यायला पाहिजे. सासूबाई आता स्वतःच्या हाताने जेवतात, काही वेळा जास्त तर काही वेळा कमी जेवतात. वॉकर घेऊन थोड्या अंतर चालतातही.'

दरम्यान, माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार स्पेनमध्ये 101 वर्षांच्या अजून दोन कोरोना बाधित रुग्णांनी कोरोनाविरुद्ध विजय मिळवला आहे. स्पेनमध्ये सध्याच्या घडीला कोरोनामुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या 22 हजारच्या वर गेली आहे. पण, आता स्पेनमधील प्रतिदिन मृत्यू आणि रुग्णांच्या संख्यातही घट होत असल्याने स्पेनवासियांना थोडा दिलासा मिळाला आहे. 

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news