नैऋत्य जपान भूकंपाच्या धक्क्याने हादरला : त्सुनामीचा इशारा

Earthquake in Japan | ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे धक्के
earthquake in japan
जपानमध्ये ६.९ रिश्टर स्केलच्या भूकंपाचे धक्के जाणवले. X Photo
Published on
Updated on

पुढारी ऑनलाईन डेस्क : नैऋत्य जपान भूकंपाच्या धक्क्याने हादरला. ६.९ रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे (Earthquake in Japan) धक्के आज (दि.१३) रात्री ९.१९ वाजता जाणवले. यानंतर जपान हवामान संस्थेने मियाझाकी प्रांतासह शेजारच्या कोची प्रांतात त्सुनामीचा इशारा दिला आहे.

हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, त्सुनामीच्या लाटा एक मीटरपर्यंत पोहोचू शकतात. भूकंपामुळे झालेल्या जीवितहानीबद्दल कोणतेही वृत्त अद्याप मिळालेले नाही. जपान ज्वालामुखीच्या चाप, रिंग ऑफ फायर आणि पॅसिफिक बेसिनमधील फॉल्ट लाइन्सच्या शेजारी असल्याने वारंवार भूकंप होतात.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news